…त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय, विक्रम पाचपुतेंची रोहित पवारांवर बोचरी टीका

Vikram Pachpute vs Rohit Pawar : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवारांवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी बोचरी टीका केली.

News Photo   2026 10 06T150256.197

Vikram Pachpute vs. Rohit Pawar

Vikram Pachpute vs Rohit Pawar : पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. रोहित पवार माझे मित्र असले तरी त्यांच्या अलीकडील पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झाला आहे, अशी बोचरी टीका पाचपुतेंनी केली. आंदोलनाच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या वादात पाचपुतेंनी रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इगो असल्याचा आरोप योग्य नसल्याचंही पाचपुते यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना खरंच इगो असता तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली नसती, मात्र सरकारनं विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकुन त्यावर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे सरकारकडुन मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरु ठेवण्यामागे नेमका हट्ट कोणाचा आहे, याचा विचार रोहित पवार यांनी करावा, असं पाचपुतेंनी म्हटलं आहे.

2029 ला तुम्ही विधानसभेत जाणार नाहीत, विद्यार्थ्यांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा आक्रमक होत इशारा

दरम्यान, पुणेकरांना वेठीस धरु नका, असा थेट इशाराही पाचपुतेंनी रोहित पवारांना दिला आहे. पुणेकरांचा संयम सुटला तर परिस्थिती वेगळी होऊ शकते, असा दावा करत त्यांनी पुणेकरांना कोणी वेठीस धरलं तर ते गप्प बसत नाहीत, असं म्हटलं. आंदोलनामुळे पुणेकरांना त्रास होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि असा प्रसंग टाळण्यासाठी रोहित पवारांनी आपल्या आंदोलनाची भूमिका बदलावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्येही हे आंदोलन आता थांबायला हवं, अशी चर्चा असल्याचा दावा पाचपुतेंनी केला आहे. मात्र रोहित पवार आंदोलन थांबवत नसल्याने ते सुरु ठेवण्याची भूमिका कार्यकर्त्यांकडुन घेतली जात असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सुरु असलेलं आंदोलन आणि त्यामागची राजकीय भूमिका यामध्ये फरक ठेवण्याची गरज असल्याचं सांगत पाचपुतेंनी रोहित पवारांनी आंदोलनाबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका मांडली आहे.

Exit mobile version