ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी कोकणातील जमीनी काही भूमाफिया बळकावत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये राज्यातील एका मंत्र्यांचा देखील सहभाग असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्योगपती गौतम अदानींसाठी हजारो हेक्टर जमिनी हडपल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
कोकणातील मागासवर्गींयांच्या अनेक जमिनी या खरेदी केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका जबाबदार मंत्र्यांने संगमेश्वर तालुक्यातील सर्कल लेव्हलच्या काही अधिकाऱ्यांना फोन केला आहे. जर हे व्यवहार लवकर पूर्ण केल्यास त्याची बदली करण्यात येईल अशी धमकी तो मंत्री द्यायाच. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आवशक्यता आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
यापूर्वी देखील बारसू येथे जो जमीन घोटाळा झाला होता तो घोटाळा पत्रकार शशिकांत वारिसे यांनी केली होती. पण त्यांची हत्या करण्यात आली. आता या संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील जमिनीच्या प्रकरणात दिनेश कांबळे हे प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या जिवाला देखील धोका निर्मान झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना धमक्या येत असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
https://letsupp.com/maharashtra/maharashtra-mp-vinayak-raut-press-conference-27018.html
त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की, संगमेश्वर तालुक्यातील मागच्या तीन वर्षातील जेवढे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत त्याची संपूर्ण चौकशी व्हावी. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात यावी व तोपर्यंत या झालेल्या जमिनीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात यावी, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच हे करत असताना दिनेश कांबळे यांचा शशिकांत वारिसे होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.