Download App

दोन आमदार अन् एका राज्यसभा खासदाराने गेम केला; फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी सांगितलं

  • Written By: Last Updated:

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्यापाही काही जागांबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असून, छ.संभाजीनगरमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरूवात झाली असून, ही नाराजी भाजप-शिवसेनेला निवडणुकांमध्ये डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये यासाठी दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने खेळी केल्याचे विनोद पाटील (Vinod Patil) म्हणाले. छ.संभाजीनगर मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. (Vinod Patil On Chatrapati Sambhaji Nagar Loksabha Seat )

जेलमध्ये जायची वेळ येऊ म्हणून शिंदे रडले, भीतीने पक्ष सोडून पळाले; राऊतांचा गौप्यस्फोट

छ.संभाजीनगरमधून मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते तसेच मराठा समन्वयक विनोद पाटील लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र, येथून भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्याने पाटीलांना नाराजीचा सूर आळवला आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती. परंतु, त्याचा फायदा त्यांना झाला नाही. त्यानंतर आज (दि.22) त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

विनोद पाटील म्हणाले की, छ.संभाजीनगरमधून शिंदे आणि फडणवीस या दोघांचीही मला तिकीट देण्याची इच्छा होती. पण दोन आमदरांनी आणि एका राज्यसभेच्या खासदाराने माझ्या नावाला विरोध केला. त्यामुळे मला तिकीट नाकारण्यात आले. परंतु, अजूनही वेळ गेलेली नसून, यात बदल होईल अशी मला आशा आहे. मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर, मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकदीने ही निवडणूक लढवणार असून, आता महायुतीने अंतिम निर्णय घ्यावा.

पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणं हे दुर्दैव, जितेंद्र आव्हाड मोदींच्या ‘त्या’ विधानावर संतापले

फडणवीसांसोबत काय चर्चा झाली?

फडणवीसांसोबत काय चर्चा झाली यावर बोलताना पाटील म्हणाले की, निवडणूक जात म्हणून लढली तर, ती लढलीच जाऊ शकत नाही. फडणवीसांना मतदार संघातील विविध मुद्द्यांवर चर्चा. तसेच माझ्या नावाचा पुन्हा एकदा फेरविचार व्हावा असेही मी त्यांना सांगितल्याचे विनोद पाटील म्हणाले. मला तिकीट मिळो अथवा न मिळो मात्र, छ.संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे पाटील म्हणाले.

वंचित, ठाकरे अन् MIM चे उमेदवार मैदानात

छ.संभाजीनगरसाठी वंचित बहुजन आघाडी, एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील मविआकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत खैरे आदींची नावे घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय माजी आमदार हर्षवर्धन जाधवही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर, महायुतीकडून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आता विनोद पाटीलदेखील छ.संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. त्यामुळे आता फडणवीस आणि शिंदे विनोद पाटलांची मागणी पूर्ण करणार की? त्यांचं मनपरिवर्तन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us