Download App

Vishwambhar Choudhary : शिवसेना संपवणे हा मूळ हेतू आहे, शिंदेंवर घणाघाती टीका

शिवसेना ( Shivsena) पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण व शिवसेना पक्षाचा ताबा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ( Eknath Shinde )  गेला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सामाजीक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishvambhar Choudhary )  यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावरुन त्यांनी शिंदे व भाजपवर टीका केली आहे. भाजपा ही शिंदेंना देखील संपवणार अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

शिवसेना संपवणे हा मूळ हेतू आहे, वेगळ्या स्वरूपात सेना टिकवणे ही तात्पुरती व्यवस्था आहे. मुंबई मनपा निवडणुकी पर्यंतची. लोकसत्तेच्या आजच्या अग्रलेखात म्हणल्यानुसार पुढचा घटनाक्रम होणार आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच सध्या पैश्यांची चंगळ चाललेली आहे. दक्षिण मुंबईतल्या पंचतारांकित हाटेलात बसून ‘गिर्‍हाईकं’ पटवणे आणि फायली क्लिअर करणे असा क्रम चालू आहे.
शेवटी पैश्यांसाठी मारामारी सुरू होणार हे उघड आहे, पण मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत भाजप हालचाल करणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या पेक्षा वयानं एक वर्ष कमी असलेल्या अमित शहांना वडीलांसमान मानून लाचार महाराष्ट्र धर्माचं दर्शन घडवलं आहे, पण कितीही शरणागतता दाखवली तरी भाजप स्वतःचा अजेंडा सोडणार नाही. ‘कार्यक्रम’ ठरलेला आहे. अनेकांची तगमग सुरू आहे भाजपात जाण्याची. मुंबई मनपा निवडणूक संपली की भाजप खोरे कुदळ घेऊन शिंदेसेनेला पोखरून काढणार हे नक्की. अडीच वर्षांच्या सत्तेसाठी आपण गद्दारी केली आणि शिवसेना बुडवतांना शिवरायांचा महाराष्ट्र धर्मही बुडवला हे त्यांना कळेल पण तेव्हा उशीर झालेला असेल, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला.

Tags

follow us