Jayant Patil Vs Devendra Fadnvis : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी (Jayant Patil) राज्यातील विविध मुद्द्यांवरुन चिमटे घेत फडणवीसांचं कौतूक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnvis) जयंत पाटलांना सडतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
Winter Session : जगदीप धनखड यांच्यावरील मिमिक्री करून राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी कोण?
अधिवेशनात राज्यातील दंगली, गुन्हेगारी, ड्रग्जची प्रकरण, रुग्णालयांच्या अवस्थेवरुन जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचा दाखला देत महाराष्ट्रातील गृहखात्यावरच ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीच्या तुलनेत सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. असं म्हणत राज्यातील गुन्हेगारीचा पाढाचं यावेळी जयंत पाटलांनी वाचला आहे.
त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनीही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील घटत्या गुन्ह्यांची यादीच वाचून काढली आहे. यावेळी हातात कागद घेत फडणवीस म्हणाले, ललित पाटीलचा कारखाना 2020 ला सुरु झालायं, महिलांवरील गुन्ह्यात महाराष्ट्र बराच मागे आहे. खुनाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र 20 व्या स्थानी असून बलात्काराच्या घटनांत 16 व्या क्रमांकावर, तर बालकांवरील गुन्ह्यात 9 व्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी फडणवीसांनी सभागृहात सांगितली आहे.
MPs Suspended : निलंबनानंतर खासदारांना संसद परिसरातही नो एन्ट्री! लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी
दंगलीच्या गुन्ह्यावर बोलताना फडणवीसांनी जमावात झालेली दंगल आणि एकल दंगल यातील फरकच जयंत पाटलांना समजावून सांगितल्याचं दिसून आलं आहे. दंगलीच्या गुन्ह्यात जयंतराव बोलले पण त्यामध्ये फरक असतो , असा टोलाही त्यांनी लगावलायं. राज्यात महिलांचे प्रकरण हाताळण्यासाठी 86 जलदगती न्यायालये 138 फास्टट्रॅक कोर्टची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र 4 थ्या क्रमांकावर आहे, अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्र मागे आहे. महिलांवरील गुन्ह्यात महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर असून ड्रग्जविरोधात 24 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस दलात 23 हजारांची भरती हा रेकॉर्ड आहे. राज्यात दंगलीच्या आधीच्या गुन्ह्यात 5.7 टक्क्याने घट झाली आहे तर खुनाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र 20 व्या स्थानी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
‘आधीच्या नेत्यांना मराठ्यांची मतं कळली, पण मन कळलं नाही’; CM शिंदेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला
मी सीएम झाल्यानंतर नागपुरला बदनाम करण्याचा प्रयत्न :
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरवर अनेकांचं विशेष प्रेम आहे. नागपूरच्या बदनामीसाठी अनेक आरोप केले जातात. नागपुरमध्ये खुनाच्या, बलात्काराच्या, गुन्ह्यांमध्ये घट झालीयं. बेपत्त झालेल्या अनेक मुली परत येत आहेत. ऑक्टोपर्यंत 338 मुली बेपत्त झल्या होत्या त्यातील काही परत आल्या आहेत 12 फक्त मुलींचा शोध मोहीम सुरु आहे. मुलींचं समुपदेशन सुरु असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.