Priyanka Gandhi : निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह वायनाड (Wayanad) आणि नांदेड (Nanded) लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूका (Wayanad Lok Sabha by-election) जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच बरोबर निवडणूक आयोगाने वायनाड आणि नांदेड लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
वायनाड लोकसभेसाठी 13 नोव्हेंबर तर नांदेड लोकसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार काँग्रेसने (Congress) वायनाड पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून राजकरणात एंट्री करणार आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडल्यानंतर वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
Congress President Shri @kharge has approved the proposal to nominate the following members as party candidates for the bye-elections to the Lok Sabha and Legislative Assembly from Kerala pic.twitter.com/QBFskzozEB
— Congress (@INCIndia) October 15, 2024
वायनाडमध्ये 1977, 1996 आणि 1998 वगळता सर्व लोकसभा निवडणुका काँग्रेसने जिंकली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा निवडली असून आता प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपल्या राजकारणाची एंट्री करणार आहे.
तर दुसरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यात 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मोठी बातमी! एअर इंडियासह चार विमानांमध्ये बॉम्ब? एका विमानाची कॅनडामध्ये इमर्जन्सी लँडिंग
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवस महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाची घोषणा होऊ शकते.