पुणे : “पूर्वी बोलताना मी फार विचार करत नव्हते, आता विचार करावा लागतो. पार्टी प्रोटोकॉल, पार्टी लाईन याची काळजी करावी लागते” असे मत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
यावेळी शिवसेनेत प्रवेश केल्यांनतर शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात काय बदललं ? या प्रश्नांवर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “दसरा मेळाव्याच्या अगोदरही अनेक लोक मला ऐकत होते, यात राज्यातच नाही तर राज्याबाहेरील देशाबाहेरील लोकही ऐकायचे पण हे सर्व लोक चळवळीवर प्रेम करणारे होते. दसरा मेळाव्याच्या सभेनंतर मुख्य प्रवाहातील लोक ऐकायला लागले.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि पूर्वी बोलताना मी फार विचार करत नव्हते, आता विचार करावा लागतो. पार्टी प्रोटोकॉल, पार्टी लाईन याची काळजी करावी लागते. पण सामान्य लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा बदलल्या आहेत.”