नाशिकचे कॅप्टन खरात यांच्या महिलांसोबत असलेल्या (Kharat) अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा अत्यंत वस्तुनिष्ठ व गोपनीय पद्धतीने तपास करून सत्य बाहेर आणल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केलं आहे.
खर तर शिर्डी पोलिसांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी ही गोष्ट सर्वात अगोदर समोर आणली. त्यांनी याबाबत गुन्हा दाखलं केला. त्यांच्या कारवाईनंतर पुन्हा चक्र फिरायला लागली असं म्हणत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांचं कौतूक केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तात्काळ दखल घेत लुकआउट नोटीस काढली असंही विखे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कॅप्टन खरात प्रकरणी 18 फेब्रुवारीला शिर्डीत नीरज जाधव याच्यावर एका तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर शिर्डी पोलिसांना कॅप्टनच्या लैंगिक शोषणाचा अमानवीय प्रकार समोर आला. केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी शोषित महिला समोर आल्या नाही, त्यामुळे हा गुन्हा शिर्डीत दाखल झाला नाही. मुख्यमंत्र्यांना शिर्डी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सर्व माहिती दिल्यानंतर कॅप्टनला लुक आऊट नोटीस बजावली गेली. त्यामुळे तो परदेशात पळून जाऊ शकला नाही, असा दावा करीत नाशिक गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभारावर विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली. खरातच्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याने किती महिलांवर अत्याचार केले आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेऊन पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसारच खरात याच्या चौकशी करिता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.
