Download App

तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन महत्वाचे तसेच ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विविध मुद्द्यांवरून थोरातांवर निशाणा साधला आहे. एक असं उदाहरण सांगा ज्याद्वारे तुम्ही जनतेच्या विकासासाठी काम केलं अशा शब्दात विखे यांनी थोरातांवर हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून देखील थोरातांना टार्गेट केले आहे.

राज्याचे महसूलमंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे येथे आले होते. यावेळी विखे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात विखे यांचे स्वागत केले. यावेळी मोठी साउंड सिस्टिमसह हजारो कार्यकर्ते यावेळी विखेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. ओपन गाडीतून विखे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्तांनी मोठया उत्साहाने विखेंचे स्वागत केले.

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग होतील दुर, जाणून घ्या हे उपाय

यावेळी विखे यांनी उपस्थित माध्यमांशी संवाद साधला. थोरातांवर टीका करताना विखे म्हणाले, सत्ता गेल्याचे हे वैफल्य आहे. सत्तेत राहून तुम्ही जनतेला काही न्याय देऊ शकला नाही. तुम्ही केवळ वाळू माफियांचे भले केले. तुम्ही एक उदाहरण दाखवून द्या ज्यामध्ये तुम्ही जनतेचं भले केलं. आज आम्ही जनतेला वेठीस धरणाऱ्या सर्व अपवृत्तीचा बंदोबस्त केला आहे. सत्ता गेल्याच दुःख थोरातांना आहे मात्र आता आपलं कोणी ऐकत नाही, आपली पत संपलेली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आहे. तुम्ही या निवडुकीतील पराभवाची जबाबदारी देखील स्वीकारली नाही आहे.

भारताला मोठा धक्का, कसोटी पाठोपाठ ‘हा’ खेळाडू एकदिवसीय सामन्यातून झाला बाहेर

या निवडणुकीतील झालेल्या पराभवाबद्दल तुम्ही जनतेची माफी तरी मागायला हवी होती. परंतु तुम्ही कोणतीच जबाबदारी स्वीकारायला तयार नसता. यामुळे या गोष्टींवर कोणतेच भाष्य करणे उचित राहणार नाही. शेवटी आम्ही आमच्या सरकारमध्ये काम करणार आहोत. अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us