कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग होतील दुर, जाणून घ्या हे उपाय

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग होतील दुर, जाणून घ्या हे उपाय

मुंबई : देशात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यातच आज होळीचा सण असल्याने सर्वत्र रंगाची उधळण होत आहे. रंगबेरंगी कलर अनेकजण या दिवशी खेळतात. अंगासह कपड्यावर कलर लावला जातो. यामूळे कपड्यावरील रंगाचे डाग सहजरित्या हटवणे हे कठीण होऊन बसते. काही रंग हे सहजासहजी निघतात तर काही रंग खुपच हट्टी असतात. यामुळे हे कपडे थेटच फेकून द्यावे लागतात. कपड्यांवरील रंगाचे डाग कसे काढायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पांढरे व्हिनेगर : कपड्यांवरील हट्टी डाग निघत नसतील तर तुम्ही पांढरे व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला व्हिनेगर व कपडे धुण्याचा निर्मा आवश्यक आहे. अर्ध्या बादली पाण्यात कपडे धुण्याचा निर्मा मिसळा आणि त्यात 1 कप व्हिनेगर मिसळा. या मिश्रणात कपडे घाला आणि 20-25 मिनिटे तसेच राहुद्य. व्हिनेगरमधील आम्ल कपड्यावरील रंग काढून टाकण्यास सहज मदत करेल.

लिंबाचा रस : लिंबामध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात. यातच कपड्यावरील डाग घालवण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. लिंबामध्ये असलेले अम्लीय गुणधर्म डाग काढून टाकण्यास मदत करतो. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये डिटर्जंट आणि लिंबाचा रस घालून याची घट्ट पेस्ट तयार करा आणि त्यानंतर डागांवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा. त्यानंतर, हलक्या हातांनी स्क्रब करा आणि धुवून टाका.

…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार

ब्लीच : रंग खेळताना जर पांढऱ्या कपड्यांवर रंगाचे डाग पडले तर तर त्यातील रंग काढणे थोडे कठीण होऊन बसते. तुम्हाला पांढऱ्या कपड्यांवरून रंग काढायचा असेल, तर अर्धा कप कोमट पाण्यात नॉन-क्लोरीन ब्लीच घाला आणि त्यानंतर या मिश्रणात रंगलेले तुमचे पांढरे कपडे घाला. हे कपडे काही काळ भिजवून ठेवावेत त्यानंतर ते धुवून टाकावेत. पांढऱ्या कपड्यांवरील रंग कमी होईल.

सरकारच्या धोरणांचा अनोखा निषेध; थेट गावच काढलं विकायला

महत्वाची टीप : कलर खेळताना रंग लागलेले किंवा डाग लागलेले कपडे तुम्ही शक्य होईल तेवढ्या लवकर धुवून टाकावे. रंग जितका जास्त काळ कपड्यांवर राहील तितके तो काढणे अधिक कठीण होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube