Download App

दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण काय? राऊतांचा भुसेंवर पलटवार

  • Written By: Last Updated:

मी आरोप केला नाही, खुलासा मागितला होता. कारण शेतकरी खुलासा मागत आहेत. दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. त्यांच्या भागातले शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना आंदोलन करायला मी सांगितले आहे का ? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दादा भुसे यांच्या दाढीला आग लागण्याचं कारण काय? असा थेट सवाल विचारत दादा भुसे जेष्ठ नेते आहेत त्यांनी अशी विधान केली नाही पाहिजे, असं मतं संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

दादा भुसे यांनी आज विधानभवनात संजय राऊत आमच्या मतावर निवडून आले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य केलं होत. त्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी तुम्हाला कोणी मते दिली? असा प्रश्न विचारला तर तुम्ही आमदार शिवसेनेच्या मतावर झाला आहात. पुन्हा निवडून येऊन दाखवा. असा टोला लगावला आहे.

काय मांडायचंय ते मांडा पण.., अजितदादा भुसेंवर का चिडले?

दरम्यान आज विधानसभेत भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचा टोला मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभेतच लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय.

मुंबईतील आणखी एक सरकारी कार्यालय दिल्लीला; हा महाराष्ट्र द्रोह नाही का? काँग्रेसचा भाजपाला सवाल

दादा भुसे म्हणाले, हे लोकं भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवारांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात, या शब्दांत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. एवढंच नाहीतर संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी, नाहीतर बाळासाहेब ठाकरे, दिघेसाहेबांचे हे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे आमच्याच मतावर निवडून गेलेले हे महागद्दार लोकं आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून हे ट्विट केलं आहे याची चौकशी करावी अन् खरं आढळलं तर मी आमदारकी नाहीतर राजकारणाचा राजीनामा देणार असल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलं आहे.

Budget Session : कानडी दंडेलशाहीचे विधानपरिषदेत पडसाद; सत्ताधारी-विरोधक भिडले !

Tags

follow us