Devendra Fadnavis : राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामध्ये सर्वच नेते आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करताना दिसंत आहेत. आज सांगोल्यात रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. (Ranjit Singh Naik Nimbalkar) यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील (Ranjit Singh Mohite Patil) कुटुंबावर जोरदार टीका केली. आम्ही आमच्या कामचं बोलतो. तुम्ही एखाद तरी काम केलं का? (Madha Lok Sabha) असा प्रश्नही फडणवीस यांनी मोहिते यांना यावेळी विचारला.
हा निर्णय सर्वांनाच आवडला असं नाही
यावेळी फडणवीस यांनी बोलताना शरद पवारांचा संदर्भ देत खळबळजनक दावा केला. शरद पवारांनी मोहिते पाटील कुटुंबाला अडचणीत आणून त्यांचं राजकारण जवळपास संपवल होत, तेव्हा आम्ही पाठीशी उभं राहिलो असं म्हणत फडणवीसांनी एकाच वेळी पवार आणि मोहितेंवर टीका केली. त्याचबरोबर, मोहिते यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या कुटुंबातील सर्वांनाच आवडलेला आहे असं नाही असाही दावा फडणवीसांनी यावेळी केला.
काही मोठ्या नेत्यांनी पाणी अडवून ठेवलं
यावेळी फडणवीस यांनी सांगोल्याचं पाणी अडवल्याचा थेट आरोप मोहिते पाटील कुटुंबावर केला. ते म्हणाले, मला वाटायच या भागात पाणी येत नाही याला निसर्गाचं चक्र असेल. येथील दुष्काळाला उपाय नाही असं मला वाटायचं. परंतु, मुख्यमंत्री झाल्यावर अभ्यास केला तर लक्षात आलं की, काही मोठ्या नेत्यांनी या भागातील पाणी अडवून ठेवलं आहे असा थेट आरोप फडणवीसांनी यावेळी केला आहे.