Who is Amol Khatal Defeated Balasaheb Thorat : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024 Result) निकाल जाहीर झाला आहे. निवडणुकीत मात्र महायुतीची सरशी होत भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव झालाय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता अमोल खताळ (Amol Khatal) यांनी राधाकृष्ण विखेंच्या मदतीने बाळासाहेब थोरात यांचे राजकारण संपविले आहे.
संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झालेत. आत्तापर्यंत बाळासाहेब थोरात यांनी आठवेळा निवडणूक लढवली होती, ते एकदाही पराभवाला सामोरे गेले नव्हते. मात्र , आता नवव्या वेळी थोरातांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. न समोर आलं होतं. आता बाळासाहेब थोरात यांचा 10, 560 मतांनी पराभव झालाय. तर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ 1,12,386 मतांनी विजयी झाले आहेत. थोरात यांना 1,01,826 मतांसह पराभवला सामोरं जावं लागलं आहे.
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय…
अमोल खताळ कोण आहेत?
संगमनेर तालुक्यात अमोल खताळ यांची एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. 41 वर्षीय अमोल खताळ हे एका साधारण शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचं पूर्ण नाव अमोल धोंडीबा खताळ (Who Is Amol Khatal) असं आहे. संगमनेर तालुक्यात अमोल खताळ भाजपचे शहराध्यक्ष तर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आहेत. ते भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे जवळचे मानले जातात. अमोल खताळ यांचे वडिल शेतकरी असून ते देखील भाजप कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य सायबर कॅफे चालक म्हणून अमोल खताळ यांना ओळखलं जातं.
Prithviraj Chavan Defeat : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत
संगमनेरमध्ये एमआयडीसी आणून रोजगार निर्मिती ते दुष्काळ आणि टँकरमुक्त संगमनेर, पर्यावरण संवर्धनाचे अनेक प्रकल्प आणि वर्षानुवर्षे संगमनेरला लागलेली ठेकेदारांची कीड संपवणार, या मुद्यांवर अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचं शिक्षण बीए झालेलं आहे. शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खताळ पाटील हे विखे पाटलांचे समर्थक आहेत.
ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यांनी शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढली.
अमोल खताळ यांच्या विजयामुळे संगमनेर तालुक्यातील राजकारणाची गणितं बददली आहेत. हा मात्र कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. माजी आमदार कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. थोरातांचा पराभव हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.
विखे पिता-पुत्रांची कमाल
ऐनवेळी अमोल खताळ यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं गेलं होतं. त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांचा मोठा पाठिंबा होता. विखे पिता पुत्रांची कमाल संगमनेर तालुक्यात पाहायला मिळाली आहे.