Download App

मराठी माणसांवर गरळ ओकली; खासदार निशिकांत दुबे कोण ?

Nishikant Dubey हे राजकारणात कसे आले. कुठून खासदार आहेत. तोंडावर ताबा न ठेवल्याने हे महायश कसे अनेकदा अडचणीत आलेत हे पाहुया...

  • Written By: Last Updated:

Who is bjp MP Nishikant Dubey :मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत. मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? आमच्या पैशांवर जगता. हिंमत आहे तर हिंदीप्रमाणे उर्दु, तमिळ, तेलुगू भाषिकांना मारून दाखवा. यूपी, बिहार किंवा तमिळनाडूला या तुम्हाला आपटून आपटून मारु अशी गरळ भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ओकलीय. त्यामुळे निशिकांत दुबे हे महाराष्ट्रातील नेत्यांच्या रडारवर आलेत. ते राजकारणात कसे आले. कुठून खासदार आहेत. तोंडावर ताबा न ठेवल्याने हे महायश कसे अनेकदा अडचणीत आलेत हे या व्हिडिओतून पाहुया…

एबीव्हीपीमधून राजकारणात प्रवेश

निशिकांत दुबे यांचा जन्म बिहारमधील भागलपूर येथील आहे. 56 वर्षीय निशिकांत दुबे ( Nishikant Dubey) यांचे कुटुंब हे आरएसएसमध्ये होते. त्यांचे चुलते जनसंघाचे नेते होते. निशिकांत दुबे हे मूळचे देवघरचे रहिवासी. हे गाव आता झारखंडमध्ये येते. त्यांचा राजकीय प्रवास देवघरमधूनच सुरू झाला. ते अगदी लहान वयातच आरएसएसच्या शाखांमध्ये जात होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेचे ते प्रमुख होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP मधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दुबे हे डॉक्टरेट आहेत. एमबीए झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापनात पीएचडी केली. काही वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. ते एस्सार ग्रुपमध्ये संचालक होते.


न्यायालयांना सिद्धांतांचा विसर पण मी… सिसोदिया अन् के. कविता केसवरून मुख्य न्यायधीशांचे ताशेरे


चारवेळा झारखंडमधून खासदार

आक्रमक भाषणातून पक्षाची बाजू मांडत असल्याने निशिकांत दुबे हे भाजपसाठी आक्रमक चेहरा झालेत. ज्या झारखंडमध्ये काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चा यांची ताकद होती. गोड्डा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचा खासदार आलटून पालटून निवडून येत होते. त्या मतदारसंघात भाजपला कधीच यश मिळाले नाही. परंतु 2009 मध्ये भाजपने येथून निशिकांत दुबे यांना मैदानात उतरविले. 2009 मध्ये डुबे यांनी काँग्रेसचे खासदार फुरकान अन्सारी यांचा पराभव केला. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 असे सलग टर्म ते येथून खासदार आहेत. ज्या मतदारसंघ झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. तोच दुबे यांनी काबीज केलाय. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे महत्त्व वाढले. लोकसभेतील भाषणे, खासगी विधेयके मांडणे, लोकसभेतील उपस्थितीमुळे त्यांना गेल्या वर्षाचा संसदरत्न पुरस्कारही मिळाला.


व्हिट्स हॉटेल प्रकरण विधानसभेत पेटलं; आंबादास दानवेंकडून शिरसांटावर वार, फडणवीसांचा कारवाईचा शब्द


थेट सर्वोच्च न्यायालयावर बोलले ! पक्ष तोंडावर पडला

वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सर्वोच्च न्यायालयाने काही दुरुस्त्या करण्यास सांगितले होते. त्यावरून दुबे बिथरले होते. त्यांनी थेट तेव्हाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयाला कायदे करायची असतील तर लोकसभा आणि विधानसभा बंद केल्या पाहिजे. देशात धार्मिक युद्ध आणि नागरी उठाव झाल्यास त्याला सरन्यायाधीश जबाबदार असतील, असे विधान केले होते. त्यामुळे भाजपला सारवासारव करावी लागली होती. तसेच अध्यक्ष जेपी नड्डा यांनी खासदार निशिकांत दुबे यांना फटकारले होते. दुबे यांचे विधान पक्षाचे अधिकृत मत नाही, असे नड्डा म्हणाले होते. (Who is MP Nishikant Dubey)


पीओकेमध्ये पाच खासदार हवेत, असे खासगी विधेयक मांडले

2014 मध्ये डुबे यांनी एक खासगी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरसाठी (POK) पाच लोकसभेच्या जागा तयार कराव्यात असे ते खासगी विधेयकाचा प्रस्ताव होता. परंतु ससंदीय समितीने हे विधेयक ग्राह्य धरले होते. तसेच 2017 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटविण्याचे खासगी विधेयक डुबे यांनीच मांडले होते. त्यानंतर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्यात आले होते. त्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला होता.


तृणमुल काँग्रेसचा महुआ मोइत्रांची खासदारकी घालावली

निशिकांत दुबे यांनीच तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्राविरुद्ध कॅश फॉर क्वेरीचा आरोप लावला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीत महुआ मोइत्रा या दोषी ठरविण्यात आल्या होत्या. माजी पंतप्रधान इंद्रा गांधी ते राहुल गांधीवर ते थेट हल्लाबोल करतात.

त्यांचे आक्रमक बोलणे भाजपला कधी फायद्याचे ठरते तर कधी तोट्याचे ठरते. मराठी व हिंदी भाषा वादावरून डुबे यांनी थेट मराठी माणसांवर घाव घातला आहे. काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ते तसे बोलले आहेत. परंतु यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसू शकतो. कारण उद्धव व राज ठाकरे यांच्या पक्षाला भाजपवर बोलण्यासाठी आयते कोलित मिळाले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

follow us