Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली

Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली

BJP MP Nishikant Dubey Contervercial statemenet about Maharashtra : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. त्यामध्ये आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली आहे.

Gauri Nalawade : गौरीचे ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

निशिकांत दुबे यांनी अगोदर ट्विट करत हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. असं अव्हान केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली आहे.

यामध्ये ते म्हणाले की, हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याची सक्ती करणारे कुणाच्या पैशांवर जगत आहेत. टाटा, बिर्ला आणि रिलायन्स हे सर्व हिंदी भाषिक आहेत. सर्व करदाते हे बिहारी, झारखंड आणि उत्तर भारतीय आहेत. आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणताही कर भरत नाहीत. तुमचा कोणताही उद्योग नाही. आमच्या झारखंड, मध्यप्रदेश, ओडिसा आणि छत्तीसगडकडे खाणी आहेत. रिलायन्सची रिफानरीही गुजरातमध्ये आहे. सेमी कंडक्टर कंपन्या गुजरातमध्ये जात आहेत.

गुन्हेगारी वाढली, कुशल सरकारी वकिलांची आवश्यकता; जाधवर ग्रुप देणार सरकारी वकील होण्यासाठी प्रशिक्षण

वरून तुम्ही लाठीमार करता. हिंमत आहे तर हिंदी भाषिकांप्रमाणे उर्दु, तमिळ, तेलुगू भाषिकांनाही मारून दाखवा. तुम्ही तुमच्या घरात मोठे आहात बॉस आहात तर युपी बिहार किंवा तमिळनाडूला या तुम्हाला आपटून आपटून मारू. आम्ही मराठी भाषेसह, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो. सर्व मराठी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो. हे राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून केलं जात आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. असं म्हणत दुबे यांनी ठाकरे बंधुंवर टीका अन् मराठी भाषिकांचा अपमान केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube