कोणाचे हॉटेल श्रीलंकेला, कोणाचे लंडणला? रामदास कदमांनी धमकावलं

रत्नागिरी : आज शिवसेना (Shivsena)शिंदे गटाच्या (Shinde Group) रत्नागिरीमधील (Ratnagiri)सभेत रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, एक दिवस येईल समोर, आज काही बोलत नाही. पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कोणाचे हॉटेल श्रीलंकेला (Shrilanka)आहेत. कोणाचे हॉटेल सिंगापूरला(Singapur) आहेत. कोणाचे हॉटेल लंडणला (London) आहेत. कोणाच्या प्रॉपर्ट्या अमेरिकेला(America) आहेत. […]

Uddhav Thackeray Ramdas Kadam

Uddhav Thackeray Ramdas Kadam

रत्नागिरी : आज शिवसेना (Shivsena)शिंदे गटाच्या (Shinde Group) रत्नागिरीमधील (Ratnagiri)सभेत रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, एक दिवस येईल समोर, आज काही बोलत नाही. पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कोणाचे हॉटेल श्रीलंकेला (Shrilanka)आहेत. कोणाचे हॉटेल सिंगापूरला(Singapur) आहेत. कोणाचे हॉटेल लंडणला (London) आहेत. कोणाच्या प्रॉपर्ट्या अमेरिकेला(America) आहेत. एकदिवस या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची धमकी यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिली आहे. आज रत्नागिरी (Ratnagiri)जिल्ह्याच्या खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.

आम्ही बेईमानी केली नाही. गुलाब पाटील आणि 20 आमदार गेले वर्षा बंगल्यावर बोलवलं. त्यांनी विनंती केली की, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आपण सोडा राष्ट्रवादी, सोडा कॉंग्रेस, त्या गेलेल्यांना आम्ही घेऊन येतो.

रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्याशिवाय गाडीत बसत नव्हते…

त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, गेट आऊट मग तुम्ही पण गेट आऊट केलंत. मग खोके म्हणायला तुम्हाला लाज वाटत नाही, खोटं बोल पण रेटून बोल, असा टोला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यावेळी म्हणाले.

ज्यांना तुम्ही गेटआऊट केलं त्यांना सांगताय तुम्ही खोके खोके म्हणून अरे कुठतरी भीती ठेवा. मग माझे पोस्टर लावले होते. कोकण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असंही यावेळी कदम म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे तुम्हालाही शपथ आहे, मिठाईचे खोके दिलेत की, नाही? असं म्हटल्यावर सर्वच हसायला लागले. त्यावर रामदास कदम म्हणाले की हसू नका, मीपण दिलेत.

सिद्धेश योगेश दोघेच घेऊन जायचे मिठाईचे खोके आणि ही माणसं खोके म्हणताहेत. लाज वाटत नाही, असं म्हणत यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची लाज काढली.

Exit mobile version