उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? हे पण लोकांना समजावून सांगावे, राष्ट्रवादीचा फडणवीस यांना खोचक टोला

“मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.” असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पहाटेच्या शपथविधीवत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी काहीही बोललो की […]

Devendra Fadnavis : 'मी मुर्खांना उत्तरं देत नाही'; राऊतांच्या 'त्या' दाव्यावर फडणवीसांचा संताप

Devendra Fadnavis : 'मी मुर्खांना उत्तरं देत नाही'; राऊतांच्या 'त्या' दाव्यावर फडणवीसांचा संताप

“मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.” असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

पहाटेच्या शपथविधीवत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल. हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. असं म्हटलं होत. त्यावर राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एक ट्विट करून हि टीका केली आहे.

हेही वाचा : Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

काय म्हणले आहे ट्विटमध्ये ?

क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे, तुम्हाला सगळे समजेल” असे देवेंद्र फडणवीस जी पहाटेच्या शपथविधी बद्दल सांगत आहेत. मग त्यांनी रात्रीच्या षडयंत्रानंतर झालेल्या पुढील दोन गोष्टी का झाल्या हे पण सांगावे.

त्यांनी पुढे म्हणले आहे की “मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.”

https://www.youtube.com/watch?v=NJSTBYe66R4

Exit mobile version