Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

  • Written By: Published:
Adani Share Price : अदानीसोबत आता LIC चा पैसाही बुडू लागला, वाचा किती कोटींचा फटका बसला?

आजपासून एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गौतम जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतून तिसऱ्या क्रमांकावरून टॉप २५ मधूनही बाहेर गेले.

पण या सगळ्यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला (LIC) ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपची बाजारात सतत घसरण सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीला एलआयसीच्या अदानीमधील गुंतवणुकीचा नफा कमी कमी होत आता ही गुंतवणूक नकारात्मक झाली आहे. म्हणजे आता LIC अदानीच्या शेअर्समध्ये तोट्यात आली आहे.

हेही वाचा : Adani Share Price : हिंडेनबर्गची भविष्यवाणी खरी ठरली, अदानीचे शेअर ८०% घसरले

काल गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर अदानी शेअर्समधील एलआयसीचे गुंतवणूक मूल्य २७,००० कोटी रुपयांवर आले. मीडिया रिपोर्टमध्ये एक्सचेंजेसवर उपलब्ध असलेल्या LIC च्या डिसेंबरच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवरून डेटा विश्लेषणावर हा आकडा जाहीर केला आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर ३० जानेवारी रोजी एलआयसीने जाहीर केले होते की अदानी ग्रुपमध्ये इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूकीचे मूल्य डिसेंबर अखेरीस ३५,९१७ कोटी रुपये होते.

त्याचवेळी त्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांमधील समभागांचे एकूण खरेदी मूल्य ३०,१२७ कोटी रुपये असल्याचे एलआयसीने जाहीर केले होते. २७ जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे बाजार मूल्य ५६,१४२ कोटी रुपये होते. पण बाजारातील सततच्या घसरणीमुळे एलआयसीचे गुंतवणूक मूल्य २७,००० कोटी रुपयांवर आले आहे.

सर्वाधिक नुकसान झालेले अब्जाधीश

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी आता २९ व्या स्थानावर घसरले आहेत. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत सुमारे ७५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यावर्षी सर्वात नुकसान झालेल्या अब्जाधिशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

मार्केट कॅपही घटले

बाजारातील सततच्या घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २४ जानेवारीपासून तब्बल ११ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचेबाजार मूल्य एक महिन्याच्या कालावधीत ५७ टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube