Adani Share Price : हिंडेनबर्गची भविष्यवाणी खरी ठरली, अदानीचे शेअर ८०% घसरले

  • Written By: Published:
Adani Share Price : हिंडेनबर्गची भविष्यवाणी खरी ठरली, अदानीचे शेअर ८०% घसरले

आजपासून एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही.

बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गौतम जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतून तिसऱ्या क्रमांकावरून टॉप २५ मधूनही बाहेर गेले. पण या सगळ्यामध्ये हिंडेनबर्ग रिसर्चची आणखी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली ती म्हणजे रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये ८५% घसरण होईल, या भविष्यवाणीची.

हेही वाचा :Kapil Sibal : “मी ही केस जिंकेन किंवा हरेन, पण घटनात्मक नैतिकता…” अडीच दिवसांच्या युक्तिवादाचा भावनिक शेवट

हिंडेनबर्गची भविष्यवाणी काय ?

हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, अदानी ग्रुपच्या सात कंपन्याचे शेअर्स सुमारे 85 टक्क्यांनी ओव्हरव्हॅल्यू आहेत. या रिपोर्टनंतर मात्र अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे लोअर सर्किट लागायला सुरुवात झाली. एका महिन्यानंतर काही दिवसाचा अपवाद वगळता रोजच घसरण पाहायला मिळाली.

एका महिन्यात अदानी ग्रुपच्या तीन कंपन्यांचे शेअर्स ८५ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर एका कंपनीचा शेअर ७९ टक्क्यापर्यत घसरला आहे. शेअर्समधील इतक्या मोठ्या घसरणीमुळे हिंडेनबर्ग यांची भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा सुरु आहे.

अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्या किती ?

शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या एकूण १० कंपन्या लिस्टेड आहेत.
१. अदानी पोर्ट्स
२. अदानी टोटल गॅस
3. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड
४. अदानी एंटरप्राइजेज
५. अदानी ट्रान्समिशन
६. अदानी पावर
७. अडानी विल्मर
८. अंबुजा सिमेंट
९. एसीसी सिमेंट
१०. एनडीटीवी

हेही वाचा : Pakistan Crisis : पाकिस्तान की कंगालस्थान? चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला, महागाई शिखरावर

किती घसरण झाली ?

हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पण यामध्ये सर्वाधिक म्हणजे अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 85 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अदानी टोटल गॅसमध्ये सर्वाधिक घसरण

हिंडेनबर्ग रिसर्चचा रिपोर्टनंतर अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७८.५ टक्के घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर्स २२ फेब्रुवारीला ८३४.९५ रुपयांपर्यंत घसरला आहे. रिपोर्ट पब्लिश होण्याआधी २४ जानेवारी २०२३ रोजी या शेअर्सची किंमत ३८८५.४५ रुपये इतकी होती. आज देखील या शेअर मध्ये घसरण होते आहे.

यासोबतच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सच्या किमतीत ७१.८ टक्क्यांची तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये ७१.४३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर अदानी ग्रुपची सर्वात महत्वाची कंपनी मानली जाणाऱ्या अदाणी एंटरप्राइजेज या कंपनीच्या शेअरमध्ये ६६.५७ टक्क्याची घसरण झाली आहे.

२२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बाजार बंद होत असताना अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये झालेली घसरण

कंपनीचे नाव आणि बाजारातील घसरण (टक्क्यामध्ये)

१. अदानी पोर्ट्स              : ४४.९३
२. अदानी टोटल गॅस        : ७९.१८
3. अदानी ग्रीन एनर्जी       : ८२.३३
४. अदानी एंटरप्राइजेज     : ६६.५७
५. अदानी ट्रान्समिशन       : ८१.३८
६. अदानी पावर               : ६२.४७
७. अडानी विल्मर             : ५५.५६
८. अंबुजा सिमेंट              : ४४.०१
९. एसीसी सिमेंट              : ३७.०३
१०. एनडीटीवी                 : ६४.८२

सर्वाधिक नुकसान झालेले अब्जाधीश

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी आता २९ व्या स्थानावर घसरले आहेत. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या संपत्तीत सुमारे ७५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. यावर्षी सर्वात नुकसान झालेल्या अब्जाधिशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

मार्केट कॅपही घटले

बाजारातील सततच्या घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २४ जानेवारीपासून तब्बल ११ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचेबाजार मूल्य एक महिन्याच्या कालावधीत ५७ टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube