खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आपल्या विरोधकांना दिलेल्या आव्हानामुळे तर ते कायम चर्चेत येतात. अशीच एक घटना आज पुन्हा घडली आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे देखील कायम एकमेकांच्या समोर येत असतात, आज पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना चांगलाच समाचार घेतला आहे. एवढंच नाही तर मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं तर मिशा आणि भुवया काढून टाकेल असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
भाजप-मनसे एकत्र येऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी चाली खेळल्या, मनसेचा मोठा आरोप
काय म्हणाले उदयनराजे?
उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा. लोकांसमोर अथवा गांधी मैदानात मी येण्यास तयार आहे. माझा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मी माझ्या मिशा आणि भुवया काढून टाकेन असं आव्हान खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिलं आहे.
पुढे शिवेंद्रराजे वर टीका करताना उदयनराजे म्हणाले की, “ज्यांच्या जीवावर यांनी संस्था स्थापन केल्या ते सर्वांना माहिती आहे. मला लाज वाटतेय सांगताना, बोलतानासुद्धा कमीपणा वाटतो. मला बोलू की नको असं झालंय, पण अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनी लोकांचे पैसे खाल्ले.”
ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?
ते पुढे म्हणाले की, “दुर्दैवाने मला सांगावसं वाटतं की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? आमच्या दारात कधी कोण आलं नाही, आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत.” त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या दोघांमधला वाद कुठे पर्यंत जातो, हे पाहणे देखील महत्वाचं आहे.