Download App

अशोक चव्हाण भाजपात जाणार? संजय शिरसाटांना भविष्य सांगणाऱ्या पोपटाने सांगितले की काय ?

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) हे येत्या काळात लोकसभा निवडणुकीआधीच भाजपामध्ये जातील असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार शिरसाट यांना भविष्य सांगणाऱ्या पोपटाने याची माहिती दिली की काय? अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार संजय शिरसाट यांना टोला लगावला आहे.

नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अशोक चव्हाण यांनी देखील आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांची बाजू घेत शिंदे गटावर निशाणा साधला होता.

एकीकडे असे असताना मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपात जातील. दरम्यान याच बाबत राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता त्यांनी प्रश्नाला उत्तर देत शिरसाट यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

लोकसभेपूर्वी पुन्हा राज्यात राजकीय भूकंप?; काँग्रेसचा बडा नेता देणार धक्का

नेमकं काय म्हणाले अजित पवार? जाणून घ्या
शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, त्यांना पिंजऱ्यात असलेल्या पोपटाने बाहेर येऊन आपल्या चोचीमध्ये निवडलेल्या चिट्ठीमध्ये हे दिसलं की काय? असा मिश्किल टोला पवारांनी शिरसाटांना लगावला आहे. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, आपण सर्वानी कालच्या सभेतील अशोक चव्हाण यांचे भाषण ऐकले असतील. असे सगळे असताना देखील अशा गोष्टी होत आहेत. तरी आपल्याला असे वाटत असले तर तुम्ही अशोक चव्हाण यांना याबाबत विचारणा करू शकता. तसेच मी देखील त्यांना भेटलो की याबाबत नक्की विचारेल असे पवार म्हणाले आहे.

पूर्व हडपसर-वाघोली स्वतंत्र महापालिकाबाबत राज्य शासनाने उचलले मोठे पाऊल

दरम्यान महाविकास आघाडीच्या नुकतेच झालेल्या सभेत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उघड उघड उद्धव ठाकरे यांची बाजू घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या बंडावर देखील भाष्य केले. तसेच गेले ते कावळे व राहिले ते मावळे अशा शब्दात चव्हाण यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे.

Tags

follow us