पूर्व हडपसर-वाघोली स्वतंत्र महापालिकाबाबत राज्य शासनाने उचलले मोठे पाऊल

Untitled Design   2023 04 03T121236.403

पुणे : पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत आता राज्य शासनानेच महत्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. या मागणीनुसार आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. दरम्यान याबाबतची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

महापालिकेत 34 गावांंचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेत येऊनही समाविष्ट गावांना पायाभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड सध्या सुरु आहे. यामुळे 34 गावांच्या समावेशानंतर देखील पुन्हा स्वतंत्र महापालिकेच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांना महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय गतवर्षाच्या अखेरीस घेतला.त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना गतआठवड्यात नगरविकास खात्याने काढली.

गिगी हदीदला ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्यांना वरुणचे सडेतोड उत्तर, म्हणाला…

स्वतंत्र महापालिकेसाठी पाटलांचे मुख्यमंत्र्याना साकडे
वाघोली गावानेही स्वतंत्र नगरपरिषद अथवा हडपसर-वाघोली महापालिका घोषित करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका किंवा पूर्व हडपसर-वाघोली महापालिका घोषित करावी अशी मागणी केली होती. तसेच या गावांच्या सोयी सुविधांचा विकास आराखडा तयार करून निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

संभाजीनगरच्या सभेत इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांची खुर्ची मोठी; मविआचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे ?

मुख्यमंत्र्यांनी या पत्राची तत्काळ दखल घेतली आहे. यासंदर्भात आता नगरविकास विभागाने स्वतंत्र नगरपालिका आणि पूर्व हडपसर वाघोलीबाबत महापालिकेला तत्काळ अभिप्राय सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात यासंबंधीचा अभिप्राय शासनाला पाठविला जाईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Tags

follow us