Download App

राजकीय पक्ष म्हणून भूमिका घेणार का? प्रकाश आंबेडकरांचा पवार – शिंदेंना थेट सवाल

Prakash Ambedkar : आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का ? असा सवाल आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar : आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का ? असा सवाल आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्या पासून (25 जुलै) सुरु होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेबद्दल माहिती दिली.

या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 21 खासदार मराठा समाजाचे निवडून गेले आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 235 पेक्षा जास्त जागा जिंकणार असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते मात्र त्यानंतर राज्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

सध्या राज्यात असा प्रचार करण्यात येत आहे की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसींना आरक्षण दिला त्यावेळेस संसदेत काँग्रेस आणि भाजपने त्यांना पाठींबा दिला नाही आणि त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संसदेत अश्वासन देऊन एका जीआरच्या मार्फत आरक्षण देण्यात आला होता मात्र प्रचार असा करण्यात येत आहे की ते जीआर कधीही बदलला जाऊ शकतो त्यामुळे आता ओबीसींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) , एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे आज जनतेला दिशा दाखवणारा कुणी नाही. जर तुम्हाला लीडरशिप करायची असेल तर एक पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? याची माहिती लोकांना असावी. लोक तुम्हाला मतदान करणार की नाही हे वेगळी गोष्ट मात्र तुम्ही एक राजकीय पक्ष म्हणून भूमिका घ्या. अशी मागणी देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली तसेच आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात

प्रकाश आंबेडकर 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करणार आहे. ही यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देणार आहे तर संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह शरद पवार, राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देखील निमंत्रित केले आहे.

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याचा चोख प्रत्युत्तर, एक जवान शहीद

25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रा सुरु होणार आहे. 25 जुलैलाच ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देणार त्यानंतर सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

follow us