Download App

सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा

Sharad Pawar retirement : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. याबाबत शरद पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचे साक्षीदार असलेले विठ्ठल मणियार यांनी मोठा दावा केला आहे.

विठ्ठल मणियार म्हणाले की शरद पवारांचा वारसदार ठरवताना अनेकांची नावे पुढं येतील. पवारांच्या डोक्यात काय आहे हे महत्वाचे आहे. त्यांच्या मनात एखादे नाव असले तरीदेखील ते सर्वांना विचारात घेऊन करतील. पण त्यांच्या सहकार्यांची वेगळ्याच नावावर सहमती झाली तर ते आपला निर्णय देखील बदलू शकतात. सुप्रिया सुळेंना पंधरा वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यांचा सामाजिक आणि राजकीय अभ्यास आहे. राज्यात आणि देशात देखील त्या आपला जम बसवत आहेत. त्यामुळे त्या देखील होऊ शकतात.

सुषमा अंधारेंचं शरद पवारांना पत्र; ‘साहेब, तुमचा निर्णय अठरापगड जातीला….’

शरद पवारांच्या आजच्या निर्णयाच्या मागे गेल्या दोन आठवड्यापासून घडत असलेल्या घडामोडी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना विठ्ठल मणियार म्हणाले की मागील घडामोडीवर असा निर्णय घेणार नाहीत कारण त्यांनी असे अनेक प्रसंग पाहिलेले आहेत. असे प्रसंगाला फक्त तोंडच दिले नाहीतर चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. परिस्थिती पुन्हा आपल्याप्रमाणे केली आहे. काहीतरी घडलं आता नको आपल्याला, अशा वृत्तीने किंवा भावनेने त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यांचा हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतलेला आहे.

विठ्ठल मणियार म्हणाले की शरद पवार यांच्या निवृत्तीची आमच्यात कोणतीही चर्चा झाली नव्हती. त्यांच्या आजारपणातून ते आता बरे आहेत. पण वाढतं वय आणि बदलेली राजकीय परिस्थिती यामुळे त्यांच्यावर ताण येत होता. त्या ताणातून कधीतरी विश्रांती मिळावी. त्यांनी उभा केलेल्या सामाजिक कामाकडे लक्ष द्यावं. राजकारणात त्यांनी अनेक माणसं तयार केली आहेत. त्यांच्याकडे माणसं निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यांच्यानंतरची दुसरी टीम त्यांनी तयार केलेली आहे, असे मणियार यांनी सांगितले.

Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय

आज राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदासाठी तीन-चार माणसांची नावं येत आहेत. तशाच प्रकारे अध्यक्षपदासाठी दुसरं नाव येऊ शकतात. पवारसाहेबांबरोबर कोणाची तुलना होऊ शकत नाही. पण त्यांनी चांगली टीम तयार केली असल्याने आम्हा मित्रांना नेहमी वाटायचे की त्यांनी आता अध्यक्षपदावरुन थांबले पाहिजे. त्यांनी आता सामाजिक कामात लक्ष घातले पाहिजे. त्या संस्थांना वाढवण्याची त्यांची देखील इच्छा आहे. गेल्या काही वर्षापासून ते राजकीय कामांपेक्षा सामाजिक कामांकडे लक्ष देत होते. त्यांचा हा निर्णय लोकांच्या दृष्टीने धक्कादायक असेल पण त्यांनी हा निर्णय विचारांती घेतला असेल, असे मणियार यांनी सांगितले.

Sharad Pawar retirement: पवारांच्या निवृत्तीनंतर संजय राऊतांचे ट्विट

नवीन माणसाला अध्यक्षपदावर आणल्यावर त्याला तयार होण्याला जास्त वेळ लागू नये म्हणून त्यांनी आता घेतलेला निर्णय योग्य आहे. निवृत्ती घेणारा माणूस कधी सांगत बसत नाही. पण त्यांच्या निवृत्तीची चर्चा होणार आहे, असे मणियार यांनी सांगितले.

Tags

follow us