Download App

Vidhan Parishad Chairman : नागपूर अधिवेशनात तरी विधान परिषदेला पूर्णवेळ सभापती मिळणार का?

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी)

मुंबई  : राज्याच्या विधिमंडळ (Legislature) इतिहासात विधान परिषदेच हे शतकोत्तरी वर्ष आहे. या वर्षात विधान परिषदेला पूर्णवेळ सभापती नाही. सध्या या पदावर शिवसेना (शिंदे गटाच्या) नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या काम पाहत आहेत. नागपूर अधिवेशनात या जागी बहुमत असलेला भाजप आपल्या आमदारांची वर्णी लावणार का ? याकडे लक्ष लागलं आहे

राज्य मागासवर्ग आयोगाकडून होणार ओबीसी, व्हिजेएनटी, मराठा जातींचं सर्वेक्षण 

यंदा विधान परिषदेचं शतकोत्तरी वर्ष आहे. त्यात नागपूर अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती यांची रिक्त जागा भरली जाईल का, याविषयी अजूनही काही हालचाली दिसत नाही. विधान परिषदेत एकूण ७७ जागा आहेत. यापैकी २१ जागा रिक्त असून सध्या विधान परिषदेत एकूण ५६ आमदार आहेत. त्यापैकी भाजपकडे २२ , राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे ७ , शिवसेना २ , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ७ , पीडब्ल्यूपी आणि रासाप प्रत्येकी एक आणि अपक्ष चार असे बलाबल आहे. जर भाजप-सेना महायुतीचे बलाबल पाहिले तर ३१ सदस्य आहेत . त्यामुळे भाजपचा उमेदवार सभापती होऊ शकतो.

पुरावे कोणाच्या बुडाखाली होते, नाव सांगा’; मनोज जरांगेंचा सरकारला खडा सवाल 

जर रिक्त असलेल्या २१ जागा पैकी राज्यपाल नियुक्त १२ जागा भरल्या तरी त्या महायुतीच्या असतील. उर्वरित रिक्त नऊ जागा या जेव्हा स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुका होतील तेव्हा विधान परिषद सदस्याची निवड होईल. तोपर्यंत भाजपा सेना महायुतीचे बहुमत असेल हे नक्की आहे.

महायुतीत देखील भाजपचे बहुमत आहे. असं असलं तरी भाजपाने विधानपरिषदेच्या सभापदी पदाबाबत दावा केला नाही. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे या ही जबाबदारी सांभाळतील. ही निवडणूक घेण्याचे ठरलेच तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राम राजे निंबाळकर हे देखील स्पर्धेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी या पदावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकी बाबत अजूनही हालचाली केल्या नाहीत.

दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उबाठा ) राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे निवडणुकीला सामोरे जाण्याइतपत बहुमताचे संख्याबळ नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने देखील या बाबत काही रस दाखवलेला नाही. एकवेळ सभापतीची निवड व्हावी यावरुन राज्यात सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात फिल्डिंग लावली जायची. आता मात्र महायुतीकडे बहुमत असून ही जागा रिक्त आहे. या सर्व बाबी पाहता निदान नागपूर हिवाळी अधिवेशनात तरी विधान परिषदेला पूर्णवेळ सभापती मिळेल का ? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us