‘पुरावे कोणाच्या बुडाखाली होते, नाव सांगा’; मनोज जरांगेंचा सरकारला खडा सवाल

‘पुरावे कोणाच्या बुडाखाली होते, नाव सांगा’; मनोज जरांगेंचा सरकारला खडा सवाल

Manoj Jarange Patil : 70 वर्षे पुरावे कोणाच्या बुडाखाली लपवले होते, त्याच नाव सांगा, असा खडा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. जाहीर सभेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. अहमदनगरमधील शेवगावात आज ते जाहीर सभेत बोलत होते.

टीमला दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन बनविलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई; क्रिकेटपासून लांब रहावं लागणार!

मनोज जरांगे म्हणाले, राज्यात 32 मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, या नोंदींमुळे राज्यातील पावणे दोन कोटी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मागील 70 वर्षे मराठ्यांच्या लेकरांना आरक्षणापासून वंचित रहावं लागलं, 70 वर्षे पुरावे स्वत:च्या बुडाखाली कोणी लपवले, त्याचं नाव सांगा, असा सवाल मनोज जरांगेंनी सरकारला केला आहे.

आरक्षणाला विरोध केला तर सोडीत नसतोयं :
कुणी कितीही विरोध टोळी करु द्या, टोळी मुकादम घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. मुकादम म्हातारं झालं तरी वळवळ करतंयं. या वयातही कळत नाही काय करावं काय नाही. वेगळाच मुकादम आहे याला दमच निघत नाही. आरक्षणाला विरोध केला तर तो कोणीही असो सोडीतच नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मी गप्प होतोत तर गप बसायचं ना, अंबडला जाऊन कशाला डिवचायचं. वय झाल्यावर माणसाला पचत नाही. खायची सवय लागली तर वरबाडून महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळं खाल्लं आहे. म्हणूनच तर जेलमध्ये जाण्याची वेळ आलीयं. मी जेलमध्ये बेसन भाकर खाल्ली म्हणलं तर जेलमध्ये कांदेही मिळतेतं असं म्हणतोयं तर खा गोणीभर जसं काय लढाई जिंकून आलायं अस सांगत असल्याची टीकाही जरांगे पाटलांनी केली आहे.

मी भेंड्यात असताना येवल्यात छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्यावर लक्ष ठेवावं, नाहीतर मी शांत बसणार नाही. शिंदे-फडणवीसांनाही सांगतो, घटनेच्या पदावरच्या माणसाने कायदा पायदळी तुडवू नये, आमचे बॅनर फाडायचं सांगणं बंद करा, आम्हाला डिवचू नका जर आमचं आग्या म्हवाळ खवळलं तर पॅन्टित शिरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Deepfake : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला जगाला डीपफेकचा धोका, एकत्र येण्याचे आवाहन

तुम्ही हे सगळे प्रकार ताबडतोब थांबवा ही मराठा समाजाकडून ही विनंती आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा. कितीही बोर्ड फाडले, तरीही आरक्षण मिळणारचं, नंतर बोर्ड तुझेपण आहेत. 24 डिसेंबर शांत रहायचं मग ते अन् आपण एकाच गल्लीत आहोत ,मग तेव्हा बघू असंही जरांगे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube