2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…

Yugendra Pawar 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? असा प्रश्न विचारला असता. यावर युगेंद्र पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे.

Yugendra Pawar

Yugendra Pawar

Yugendra Pawar on Pawar vs Pawar in Elections 2029 : राज्यामध्ये राजकारणात कायम केंद्रस्थानी असणारं घराणं म्हणजे पवार घराणं. त्यात निवडणुक कोणतीही असो पण घरातील लढतीची चर्चा तर कायम सुरू असते. त्यात गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या बारामतमध्ये कायम पवार विरूद्द पवार या लढतीची चर्चा सुरू असते. यामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर आता थेट 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? असा प्रश्न विचारला असता. यावर शरद पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी थेट उत्तर दिलं आहे.

युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…

युगेंद्र पवार यांनी आज 25 मे रोजी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, 2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे उद्या काहीही होऊ शकते. मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे 2029 आणखीन तीन वर्ष उर्वरित आहेत. एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात. तुम्ही 2028 ला मला विचारा मग मी सांगतो.

राष्ट्रवादीत काय चाललय?….आमदाराला राजीनामा देण्याच्या सूचना?, काय घडलं?

तर विलीनीकरणाबाबत सगळेच जण संभ्रमात होते. मात्र विलीनीकरण आता होणार नाही. त्यामुळे आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं की, विलीनीकरण होणार नाही. त्यांचं निरोप संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोललो. विलीनीकरण आता होणारच नाही चर्चा होती हे ठीक आहे पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. आपण अजित दादांसोबत जाणार होतो विलीनीकरण जर झालं असत सर पवार साहेबांनी आणि अजित दादांनी शंभर टक्के माझी काळजी घेतली असती हा विश्वास मला आहे.

Exit mobile version