Download App

दादा विरुद्ध दादा! अजित पवार-चंद्रकांत पाटील वादात अडकली पुण्यातील 400 कोटींची कामे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील छुप्या संघर्षात जिल्ह्यातील 400 कोटींची कामे अडकली आहेत. जिल्हा नियोजन समितीने 400 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे, मात्र या बैठकीच्या इतिवृत्तावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच केलेली नाही. यासाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील शीतयुद्ध जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. (400 crore works in the district are stuck in the secret conflict between DCM Ajit Pawar and Guardian Minister Chandrakant Patil.)

400 कोटींची विकासकामे :

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी 800 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. मात्र, पाटील यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे आल्यावर या मंजुर कामांना कात्री लावली आणि जिल्ह्यातील भाजपबहुल भागाला 400 कोटींचा निधी दिला. आता त्या विकासकामांना मंजुरी दिलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीच करू नये, यासाठी दबाब आणण्यात येत असल्याने 400 कोटी सहीविना अडकून पडले आहेत.

मारीच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी; ITC कंपनीला ग्राहक न्यायालयाचा मोठा दणका

शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. परंतु पालकमंत्रीपदाची वाट न बघता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पुण्यात बैठकांचा धडाका सुरु केला आहे. अजित पवारांच्या या धडाक्यामुळे पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना अजित पवार हे पुणे जिल्ह्याचेच पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्न याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींचे PM मोदींना खरमरीत पत्र; नऊ मुद्द्यांवरून घेरलं

मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पुरेपुर वापर करत अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्रिपद जरी आपल्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याने त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असल्याचे सांगितले जात आहे.  मात्र पवार यांच्या या बैठकांमुळे चंद्रकांतदादांसह अधिकाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली आहे. पुण्यातील कामांसंदर्भात चंद्रकांत पाटीलही अधिकाऱ्यांना सूचना करत असतात. मात्र दोन मंत्र्यांपैकी नेमके ऐकायचे तरी कोणाचे? अजितदादांचे ऐकायचे की चंद्रकांतदादांचे? असा सवाल अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

Tags

follow us