Download App

Pune accident: अपघात घडला त्या रात्री अग्रवालांचे टिंगरेंना 45 मिस्ड कॉल, पोलिसांची माहिती

पुणे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या रात्री अग्रवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल्स आले होते.

MLA Sunil Tingre : पुणे अपघात प्रकरणामध्ये प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, सरकारी यंत्रणा, धनाढ्य यांचे कसे आणि किती हितसंबंध आहेत हे उघडकीस येऊ लागलं आहे. (Pune accident) दरम्यान, अपघात झाला तेव्हा त्यातील कार चालक मुलाला पोलिसांच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. (Sunil Tingre) तेव्हापासून गुन्हेगाराला वाचवण्यासाठीच टिंगरे धावून गेले असल्याचा संशय व्यक्त होतोयला. आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे.

Pune Accident मध्ये आमदाराचा मुलगा ते तावरेंच्या जीवाला धोका; पटोलेंचे धक्कादायक खुलासे

आमदार सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. त्यांचं नावं या अपघात प्रकरणात पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. आता टिंगरेंना विशाल अग्रवालच्या मोबाईल नंबरवरुन 45 मिस्ड कॉल गेले होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपीच्या वडिलांनी टिंगरेंना इतके कॉल का केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे हे सगळे कॉल 19 मे रोजी म्हणजेच अपघात झाला त्या रात्री करण्यात आलेले आहे.

 

या प्रकरणावर आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, अपघातानंतर आपण येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. पण पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मेच्या मध्यरात्री २.३० ते ३.४५ च्या दरम्यान म्हणजेच सव्वा तासात टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल आले. त्यावेळी टिंगरे झोपलेले होते. त्यांनी एकही कॉल घेतला नाही. त्यानंतर अग्रवाल घाईघाईत टिंगरेंच्या घरी पोहोचले, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

रक्ताळलेला भ्रष्टाचार; पुणे अपघात प्रकरणात सरकारला आरोपी करा, सामनातून प्रहार

आमदार टिंगरे यांनी २० मे रोजी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये टिंगरे सकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच होते, ही बाब स्पष्ट झाली आहे. दरम्यान, या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई करा असं आपण पोलिसांना सांगितलं. त्यांच्यावर कोणताच दबाव आणला नाही, असं त्यांनी स्पष्टीकरणात म्हटलेलं होतं. पण अग्रवाल यांच्याशी टिंगरेंचे असलेले संबंध, गुन्हा घडला त्याच रात्री टिंगरेंना आलेले ४५ मिस्ड कॉल्स, टिंगरेंनी तावरेच्या नियुक्तीसाठी दिलेलं शिफारसपत्र यामुळे त्यांच्याबद्दल संशय वाढला आहे.

follow us