कात्रज : आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचे काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असं मत राज्याचं आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ३५ जणांच्या कुटुंबीयांना सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या (Bhairavanath Group of Industries) माध्यमातून व डॉ. तानाजी सावंत यांच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कृष्णा श्रॉफचा शोस्टॉपर मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये जलवा
यावेळी धनगर समाजातील दोन आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही मदत करण्यात आली. सावंत म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोण त्या कुटुंबाकडे पाहत नाही. आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल. परंतू, कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की, टोकाचा निर्णय घेऊ नका. हा लढा कशासाठी सुरू आहे ते पाहा. शासन आपला निर्णय घेईल. मराठा समाज माझा असून आत्महत्या, आरक्षण हे अंतिम साध्य नाही.
प्रकृती ठीक नसल्यानं दिवाळीतील भेठीगाठी केल्या रद्द; अजितदादा म्हणाले, ‘आजारपणामुळे अशक्तपणा…’
आत्महत्या केलेल्या ३५ कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देण्यात येत आहे. संबधित कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुले व मुलींचे लग्नापर्यंतचा खर्च मी आजपासून उचलत आहे.’ मागील दोन महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत.
मागील वेळी देखील मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गाने काढणयात आले. या दरम्यान ४२ जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे. अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलने सुरू झाली, असल्याचे मतही सावंत यांनी व्यक्त केले.
राज्यात आत्महत्या होणे योग्य नाही
मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान दिले आहे. मला अत्यंत दुःख वाटते की, संबधित समूहातील कुटुंबाशी कशी चर्चा करायची? परंतु, समाज प्रबोधन करुन आत्महत्येचा विचार दूर करणे गरजेचे आहे. आत्महत्या हा काही योग्य मार्ग नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढा देण्यास शिकवले आहे. राज्यात आत्महत्या होणे योग्य नाही. महाराजांची शिकवण लढण्याची आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण काम केले पाहिजे. जीवनात अनेक संकटे येत असतात. पण, त्यांना सामोरं जातांना लढणं गरजेचं असल्याचं समाजातील लोकांनी लक्षात घेणं गरजेच आहे, असंही ते म्हणाले.