Download App

जाधवर ग्रुपचा डंका! आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या 59 विद्यार्थ्यांची टीसीएसमध्ये निवड

Jadhavar Group of Institutes Students Selected in TCS : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या (Jadhavar Group of Institutes) आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (Aditya Institute) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. या ड्राईव्हमध्ये 740 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १३० जण अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये पात्र ठरले. अंतिम मुलाखतीनंतर 59 विद्यार्थ्यांची (students) टीसीएस बीपीएस मध्ये निवड झाली.

यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. अनिता खटके, टीसीएस बीपीएसचे मानव संसाधन व्यवस्थापक राहुल गिरी उपस्थित होते. राहुल गिरी यांनी प्लेसमेंट प्रक्रियेबाबत माहिती देत कंपनीतील करिअर संधी बद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, जाधवर ग्रुपचा प्रवास हा केवळ शैक्षणिक उत्कृष्टता, सर्वांगीण विकास आणि उद्योग क्षेत्राशी घट्ट नाते यांवर आधारित नाही, तर समाजात सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यावर आमचा भर असतो. विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे.

महाराष्ट्राचा ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं 95 व्या वर्षी निधन

अॅड. शार्दूल जाधवर म्हणाले, चांगल्या संधी या उज्ज्वल भविष्याकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. पण केवळ संधी पुरेशा नसतात, तर त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी कठोर परिश्रम आणि तयारी आवश्यक असते. आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणाऱ्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या माध्यमातून विद्यार्थी आपले करिअर घडवतात.

Video : पार्थ पवार अन् जॅकलिनने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; दानपेटीत टाकण्यासाठी पैसेही दिले

डॉ. अनिता खटके म्हणाल्या, शिस्त, सातत्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्यवृद्धी ही व्यावसायिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कमकुवत बाजू ओळखून त्यावर सातत्याने काम केले, तर कुठल्याही क्षेत्रात यश दूर नाही. उद्दिष्ट स्पष्ट ठेवून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच उज्ज्वल भविष्य मिळते.

राहुल गिरी म्हणाले, टीसीएस बीपीएस मध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. भरती प्रक्रियेत प्रामाणिकपणा, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी निर्णायक ठरतात. विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अपडेट ठेवणे, नवीन कौशल्ये शिकणे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक टप्प्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. अशा वृत्तीने काम करणाऱ्यांसाठी कॉर्पोरेट जगतात प्रगतीचे दार नेहमी उघडे असते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. रजनीश मिश्रा आणि प्रा. सुचेता एस. चौधरी यांनी केले.

 

follow us