Download App

बड्या कर्जदारांवर एसबीआय मेहेरबान; तब्बल 84 हजार कोटींवर पाणी सोडलं!

स्टेट बॅंक ऑफ इंडिया बड्या कर्जदारांवर मेहेरबान झाली असून तब्बल 84 हजार कोटी रुपयांच्या कर्जावर पाणी सोडलं असल्याची माहिती बॅंकेचे शेअर होल्डर विवेक वेलणकर यांनी दिलीयं.

SBI Loan : देशातील सर्वात मोठी एसबीआय बॅंक (SBI Bank Loan) बड्या कर्जदारांवर मेहेरबान झालीयं. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने तब्बल 84 हजार कोटी रुपयांच्या कर्जावर पाणी सोडलंय. दरम्यान, मागील 8 वर्षांत एसबीआयने 100 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे कर्जवाटप केलंय. त्यातील 1, 38, 215 कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली आहेत. आत्तापर्यंत त्यातील 12 टक्के कर्जाची वसुली झाली असल्याची माहिती एसबीआयचे शेअर होल्डर आणि सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek velankar) यांनी दिलीयं. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे शेअर होल्डर विवेक वेलणकर यांनी कर्जथकबाकीदारांची माहिती मागितली असता त्यांनी ही धक्कादायक माहिती देण्यात आलीयं.

आम्ही सर्वांना आदेश देऊ शकतो; ‘लाडकी बहीण अन् लाडक्या भावांचा’ उल्लेख करत SC नं झापलं!

मागील 7 वर्षांत एसबीआय एनसीएलटीमधील वसुली प्रकरणांमध्ये एसबीआयला 65 टक्के रकमेवर पाणी सोडावं लागलंय. स्टेट बँकेने मागील 8 वर्षांत बड्या कर्जथकबाकीदारांची 1,41,535 कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली आहेत. त्यातील 12 % कर्जाची म्हणजेच 17,584 कोटी रुपयांची आजतागायत वसुली होऊ शकली आहे. यासंदर्भात बड्या कर्जदारांची नावे देण्यात बॅंकेने नकार दिला असून बॅंकेकडून 2020 साली शेअर होल्डरांची नावे देण्यात आली होती, असंस वेलणकर यांनी स्पष्ट केलंय.

शिंदे सरकारची शिंदेशाही; विरोधात काम केल्यास ‘लाडकी बहीण’मधून नाव डिलिट, आमदाराची धमकी

बॅंका कर्जथकबाकीदारांवर NCLT सह विविध न्यायिक संस्थांकडे केसेस दाखल करुन कर्जप्रकरणे निकाली काढत असतात. यामध्ये काही प्रकरणांमध्ये बॅंकेने कर्जदारांकडून कमी रक्कम स्विकारुन निकाली काढले आहेत. मागील 7 वर्षांत एनसीएलटीमध्ये 1,30,105 कोटी रुपयांची 244 कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये बॅंकेला 65 % रक्कमेवर 84, 37 कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलंय. तर कमी रक्कम स्विकारलेल्या कर्जदारांची नावेही देण्यास बॅंकेकडून नकार देण्यात आला असल्याचं वेलणकरांनी सांगितलंय.

रॉकस्टार डीएसपीचा इंडिया टूर जाहीर! हैदराबादमधून ‘या’ दिवशी होणार सुरुवात

संचालकांवर कारवाई नाही हे दुर्भाग्य…
दरम्यान, एसबीआय बॅंक छोट्या कर्जथकबाकीदारांच्या नावासह त्यांच्या बदनामीकारक जाहिरात प्रसिद्ध करतात मात्र, बड्या कर्जदारांबाबत बॅंक बोटचेपी भूमिका घेत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय फक्त बघ्याची भूमिका घेत असून हजारो कोटी रुपयांवर पाणी सोडणाऱ्या बॅंकेच्या संचालकांवर कारवाई होत नाही हे दुर्भाग्य असल्याचं विवेक वेलणकरांनी म्हटलंय.

follow us

संबंधित बातम्या