बारामतीत धक्कादायक घटना! दोन कुटुंबातील चौघांचा गुदमरुन मृत्यू…

पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बारामतीमधील खांडजमध्ये जनावरांच्या मलमूत्र साठवण टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने एकच खळबळ उडालीय. Sushma Andhare : सुषमा अंधारेंना पाहताच ‘ती’ महिला ढसाढसा रडली बारामती तालुक्यातील खांडज इथं एकाच गव्हाणे कुटुंबातील चार जणांचा जनावरांच्या मलमूत्र साठवण्याच्या टाकीत पडून गुदमरुन मृत्यू झाला आहे. […]

455456

455456

पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बारामतीमधील खांडजमध्ये जनावरांच्या मलमूत्र साठवण टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने एकच खळबळ उडालीय.

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना पाहताच ‘ती’ महिला ढसाढसा रडली

बारामती तालुक्यातील खांडज इथं एकाच गव्हाणे कुटुंबातील चार जणांचा जनावरांच्या मलमूत्र साठवण्याच्या टाकीत पडून गुदमरुन मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये गव्हाणे कुटुंबियातील चार जणांचा समावेश आहे.

जितेंद्र आव्हाडांबद्दलच्या ‘त्या’ऑडिओ क्लिपबाबत मोठा खुलासा

या दुर्देवी घटनेत भानुदास अंबादास पाटोळे, प्रविण भानुदास पाटोळे, प्रकाश सोपान पाटोळे, बाबा पिराजी गव्हाणे, यांचा मृत्यू झाला आहे.

आयपीएलच्या आधी चेन्नईचा कर्णधार माहिचा ‘रॉकस्टार’ लूक व्हायरल, पाहा VIDEO

मयत भानुदास आणि प्रवीण पाटोळे हे पिता-पुत्र असल्याची माहिती मिळत आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

दरम्यान, या घटनेचा माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Exit mobile version