Sushma Andhare : सुषमा अंधारेंना पाहताच ‘ती’ महिला ढसाढसा रडली

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 15T175314.437

Sushma Andhare :  शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे ( Prakash Surve )  व नेत्या शीतल  (Sheetal Mhatre ) म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील विनायक डायरी या तरुणाच्या घरी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare यांनी भेट दिली आहे. या भेटीत त्या मुलाच्या आईने सुषमा अंधारे यांना पाहताच टाहो फोडला आहे.

पोलिसांनी विनायक डायरी याच्यासह अन्य काही जणांना अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्या तरुणाच्या घरी भेट दिली आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट  करत याची माहिती दिली आहे. पोलिसांनी अत्यंत वाईट पद्धतीने या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाला अटक केल्यानंतर तिथल्या स्थानिक गुंडांनी त्याच्या आईला त्रास दिला असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी त्या मुलाच्या घरी जाताच त्याच्या आईचा अश्रूंचा बांध फुटला.

Budget Session : मंज़िल से जरा कह दो..,अभी पहुंचा नही हूँ मैं, फडणवीसांचं मुंडेंना जशास तसं उत्तर

तेथील स्थानिक गुंडांनी विनायक डायरी याच्या आईला त्रास दिला आहे. तसेच त्यांच्या घराची नासधूस केली आहे. त्याच्या आईची कोणीही तक्रार दाखल करुन घेतलेली नाही. त्यामुळे मी आज त्यांच्या घरी भेट दिली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे त्या म्हणाल्या आहेत.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार प्रकाश सुर्वे यांचा शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरुन विधानसभेतही जोरदार खडाजंगी झाली आहे.

Tags

follow us