Download App

Dog Attack : भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट! चाकणमध्ये चिमुरड्यावर जिवघेणा हल्ला

भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला.

  • Written By: Last Updated:

Stray Dog Attack Video : पुण्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. या भीषण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून (Dog Attack ) त्यानुसार सात ते आठ भटकी कुत्री लहान मुलाचे लचके तोडताना दिसून येत आहेत. चाकण जवळील कडाचीवाडी येथे लोकवस्तीत ही घटना घडली.

अजबच! अंतराळातून मतदान करणार सुनीता विलियम्स; NASA चा खास प्लॅन

नागरिकांनी प्रसंगावधान दाखवलं

कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत होता. तेव्हा अचानक सहा ते सात कुत्र्यांच्या टोळक्याने मुलावर हल्ला केला. थोड्याच वेळात जवळपास असलेल्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांनी धाव घेत कुत्र्यांना हुसकाऊन लावले. नागरिकांना प्रसंगावधान दाखवल्यामुळे या मुलाचा जीव बचावला. दरम्यान या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे.

चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी हि कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत आहे ही चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे

follow us