पुण्याच्या हवेली तालुक्यातील वरदाडे (Pune) येथे रिंग रोडच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. घडलेल्या दुर्घटनेत एका तरुण ऑपरेटरचा बुडून मृत्यू झाला. विजय कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून सुरक्षेच्या नियमांकडं दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्याच्या हवेली तालुक्यातील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामादरम्यान क्रेनवर चढताना संबंधित विजय कुमारने कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साधन, विशेषतः लाइफ जॅकेट किंवा इतर सुरक्षात्मक उपकरण वापरले नव्हतं. याचदरम्यान शिडीवरून त्याचा पाय घसरून तो थेट सुमारे ४० फूट खोल नदीपात्रातील पाण्यात कोसळला.
Unseasonable rain : पुणे, नाशिकमध्ये मुसळधार; पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस
हेर येऊ शकला नाही आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तसेच अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तत्काळ शोध आणि बचाव कार्य सुरू करून मृतदेह पाण्याबाहेर काढला.
या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. योग्य सुरक्षात्मक साधनांचा वापर केला असता ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
