मार्च महिना जागतिक स्तरावर खूप घटनापूर्ण; अमेरिका आणि इराण युद्धाबाबत ‘मन की बात’मध्ये मोदींकडून चिंता व्यक्त
सध्या आपल्या शेजारी गेल्या एका महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. लाखो भारतीय कुटुंबे त्यांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आज रविवार 29 मार्च 2026 रोजी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांसोबत संवाद साधला. सध्याच्या परिस्थितीमध्ये जग एका वेगळ्या संकटात आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. भारत त्यातून मार्ग काढत आहे. पण कुठे ना कुठे एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्याबद्दलच बोलताना नरेंद्र मोदी दिसले. ‘मन की बात’मध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इराण युद्धाबाबत चिंता व्यक्त केली.
यासोबतच त्यांनी या काळात देश एकत्रितपणे या आव्हांनावर मात करेल, असेही म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हा मार्च महिना जागतिक स्तरावर खूप घटनापूर्ण ठरला आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल की, कोविडमुळे जगाला काही काळ अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आम्हाला नक्कीच आशा होती की, या संकटावर मात केली जाईल. जग नव्या सुरूवातीसह प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करेल. पण विविध प्रदेशांमध्ये युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत राहिली.
12,000 कोटींपासून भाड्याच्या घरापर्यंत! द कम्प्लिट मॅन; विजयपत सिंघानिया यांची धक्कादायक कहाणी
सध्या आपल्या शेजारी गेल्या एका महिन्यापासून भीषण युद्ध सुरू आहे. लाखो भारतीय कुटुंबे त्यांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात. विशेषतः आखाती देशांमध्ये राहतात आणि काम करतात. तेथे उपस्थित 1 कोटींहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवल्याबद्दल मी खरोखरच आखाती देशांचे आभार मानतो. नरेंद्र मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले की, मुळात म्हणजे ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तिथे आपल्या ऊर्जेच्या गरजांचे प्रमुख केंद्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचा जागतिक तुटवडा निर्माण झाला आहे.
भारत आपल्या जागतिक संबंधांमुळे विविध देशांकडून मिळणाऱ्या मदतीमुळे आणि गेल्या दशकात निर्माण केलेल्या क्षमतांमुळे धैर्याने सामोरे जात आहे. यावेळी एकजूट राहण्याचे आणि यादरम्यान राजकारण न करण्याचे आवाहन केले. चुकीच्या माहितीमुळे राष्ट्रीय हिताला हानी पोहोचू शकते असेही त्यांनी म्हटले. यासोबतच अफवा पसरवण्याविरोधात त्यांनी इशाराही दिला. लोकांना केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. सध्याच्या काळ आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी म्हटले.