Download App

‘दादां’वरील आरोपांनंतर बोरवणकरांचं विमान तिकीट अन् निमंत्रणही रद्द; आपच्या नेत्याची पोस्ट

Meera Borwankar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जागेच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केल्यानंतर मीरा बोरवणकर(Meera Borwankar) यांचं विमान तिकीट रद्द करण्यात आलं होतं. बोरवणकर यांना ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हलचं’ निमंत्रणही रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते विजय कुंभार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत दिवाळी जवळ आलीयं लवकरच फटाके फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. कुंभार यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अजित पवार चांगलेच वादात सापडल्याचं दिसून आले. 2010 मध्ये येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा आणि आपण त्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

याच प्रकरणात आता मीरा बोरवणकर यांनी आणखीही काही गंभीर दावे केले आहेत. आपण जमीन हस्तांतरण करण्यासाठी नकार देताच अजित पवार यांनी आपला बदला घेतला असं त्यांनी म्हंटलं आहे. बोरवणकर म्हणाल्या, मी जागेचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी नकार देताच ही बोली ज्याने जिंकली त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याला ज्या किमतीत जागा विकण्याचं ठरलेलं ती बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत दिली गेली होती माझं नशीब चांगलं की नंतर याच खाजगी व्यक्तीला सीबीआयने 2G घोटाळ्यात आरोपी केलं, असल्याचं बोरवणकर यांनी म्हटलं.

अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मीरा बोरवणकर यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांवर बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे, त्यांनी सादर करावे अन्यथा पक्षाच्यावतीने त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिला.

Sanjay Raut : डिसेंबरमध्ये सरकार जाणार म्हणून जानेवारीची मुदत; राऊतांनी सांगितलं CM शिंदेंच्या मनातलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले आहे. “मी कधीही अशा जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरे तर अशा लिलावांना माझा विरोध आहे. इतकंच नाही तर जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत. आम्ही अशा जमिनी विकू शकत नाही. असे मुद्दे महसूल विभागासमोर जातात, जे राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवतात. मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडी रेकनर दरानुसार जमिनीची किंमत ठरवतात. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे मला सांगायचे असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातलं राजकारण चांगलच ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजय कुंभार यांनी या आरोपांमुळेच मीरा बोरवणकरांचं तिकीट रद्द झालं, त्यांचं ‘डेक्कन लिट्रेचर फेस्टिव्हलचं’ निमंत्रणही रद्द करण्यात आलं असल्याचं कुंभार यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us