शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

शरद पवार गटाच्या तिन्ही खासदारांना अपात्र करा, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

Sunil Tatkare on Supriya Sule : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना लिहिले आहे. त्यांच्या पत्राला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. आम्ही देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती तटकरेंनी दिली.

सुनील तटकरे म्हणाले की आम्ही देखील खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील आणि खासदार मोहमद फैजल यांच्याविरोधात याचिका दाखल केली केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी देखील खासदार फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्याविरोधात यायिका दाखल केली आहे. खासदार अमोल कोल्हे आमच्यासोबत आहेत. त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सांगितले आहे. आम्ही देखील विधानसभा अध्यक्षांकडे पहिल्यांदा दाद मागितली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विशसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या मार्गाने आहेत. 45 आमदारांचे समर्थन आहे आणि आमच्या अध्यक्षांनी लोकशाही मार्गाने निर्णय घेतले आहेत. आमची देखील लोकसभा अध्यक्षांकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुनील तटकरे म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी देशातील राजकीय गोंधळामागे अदृश्य शक्तीचा हात आहे असा आरोप केला होता. यावर तटकरे म्हणाले की संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती असं बोलत असतात. तो त्यांचा अधिकार पण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने अलिकडच्या काळात दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात निर्णय घेतला. तो निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून शिक्तामोर्तब होईल, असे ते म्हणाले.

Sunil Tatkare यांचा मोठा गौप्यस्फोट; अमोल कोल्हे अजित पवार गटातच; आमच्याकडे ‘ते’ प्रतिज्ञापत्र

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करावे. परिशिष्ट दहानुसार पक्षविरोधी कृती केल्याने तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती लोकसभा अध्यक्षांना केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube