Accused Arrested Going Chhawa Movie : छावा चित्रपट सध्या देशभर चर्चेत आहे. शंभूराजांच्या संघर्ष आणि मरणयातना प्रेक्षकांच्या ह्रदयाला भिडत आहेत, आणि त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसत आहे. (Chhawa) अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेले मोक्का आरोपी पकडले गेले आहेत. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत दोघांना अटक केली.
छावातील त्या सीन्सवर कान्होजी-गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप; दिग्दर्शक उतेकरांनी मागितली माफी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील वैभव टॉकीज येथे आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने पकडले आहे. आरोपींची नावे धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय 22) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय 23) अशी आहेत. दोघेही दिघी येथील शिव कॉलनीचे रहिवासी आहेत.
यापूर्वी दोन्ही आरोपींवर मकोका, एनडीपीएस कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. 21 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हडपसरमधील वैभव टॉकीज परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले आणि आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपींना दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ते आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात छावा चित्रपट पाहण्यासाठी मोक्का असलेले आरोपी गेले होते. याची टीप पोलिसांना लागल्यावर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि कोम्बिंग ऑपरेशन करत दोघांना शिताफीने अटक केली. छावा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. हडपसर परिसरातील वैभव टॉकिज परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय 22) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (वय 23, दोघेही रा. शिव कॉलनी, दिघी) अशी अटक केलल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), ‘एनडीपीएस’ कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दिघी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी (21फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदारांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. सात दिवसांतच या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. 2025 च्या वर्षात 200 कोटींचा टप्पा पार करणारा छावा हा पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने 219.75 कोटींचा गल्ला जमवला आहे, आणि या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.