छावातला ‘तो’ प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल, दिग्दर्शकाला इशारा

  • Written By: Published:
छावातला ‘तो’ प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल, दिग्दर्शकाला इशारा

Sambhaji Brigade : ‘छावा’ चित्रपटाल (Chhawa Movie) चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आलाय. या चित्रपटात संभाजी महाराजांना कैद करून देण्यात कोणी मदत केली, हे दाखवण्यात आलंय. मात्र, राजेशिर्के कुटुंबाने ‘छावा’ (Chhawa) सिनेमावर आक्षेप घेतला आहे. शिर्केंच्या वंशजांनी गणोजी शिर्केंना खलनायक दाखवलं, ते चुकीचं असून बदलण्यात यावं, अशी मागणी केली त्यांनी केली.तर आता संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) शिर्के घराण्याला पाठिंबा दर्शवला आहे.

आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात, “देशभक्तीचे खोटे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे खरे चेहरे उघड 

शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबीय पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात एकत्र जमले होते. यावेळी छावा चित्रपटाच्या विरोधात तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या विरोधात लढण्याची रणनीती ठरवण्यात आली. यावेळी शिर्के कुटुंबीयांसोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्त्यांनी देखील हजर राहत पाठिंबा दर्शवला. उतेकर यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी ब्रिगड स्टाइलने धडा शिकवाला लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिला.

चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर…
शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधलांना सांगितलं की, शिर्के यांना चित्रपटात गद्दार ठरवून दिग्दर्शकाला काय साध्य करायचं आहे? यामध्ये कुठंतरी बामणी कावा दिसतोय. एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मेव्हणे गद्दार दाखवायचे, हा प्रकार आम्हाला मान्य नाही. संभाजी ब्रिगेड हे अजिबात खपवून घेणार नाही. आता रस्त्यावरचा लढा सुरू होईल. चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, मस्साजोग येथून होणार सुरु ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, इतिहास घडवला मावळ्यांनी, लिहिला मनुवादी कावळ्यांनी. काही पात्रांची बदनामी करून तुम्हाला काय करायचे आहे. इतिहासाचे पुन:लेखन करण्याची गरज आहे. उतेकरांनी आम्हाला शहाणपणा शिकवायाची नाही. ‘छावा’ ही कादंबरी इतिहास नाही. ही कादंबरी कल्पनाविस्तारावर लिहिलेली आहे. उतेकरांनी पळवाट शोधू नये. जर उतेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाहीतर आम्हाला उतेकरांना शोधावे लागेल आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवावा लागेल, असा थेट इशारा शिंदेंनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube