पुणे : माझ्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे, माझ्या पाठीवर चाळीस वार करण्यापेक्षा समोरुन एक वार करुन पाहाच, अशी डरकाळी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोडलीय. प्रचारसभेत बोलत असताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना थेट ललकारल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. आदित्य ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अजित पवारांसमोर डरकाळी फोडलीय.
आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या राज्यात प्रस्थापित असलेलं सरकार हे घटनाबाह्य असून आगामी काळात हे सरकार देशासाठी आणि राज्यासाठी घातक असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय. तसेच राज्यात महिलांविषयी आदर राहिलेला नसून एका महिला खासदाराला मंत्र्यांकडून शिवीगाळ करण्याचं राजकारण या सरकारकडून सुरु असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केलाय.
Balasaheb Thorat : ‘सत्यजित काँग्रेसला तुझ्याशिवाय करमायचे नाही’ काँग्रेसमध्ये परतण्याचे आवाहन
आम्ही राज्य सरकारविरोधात बोललो तर आमचाही गळा घोटण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असून जसा आमचा गळा दाबण्याचा प्रकार सुरु आहे, अगदी तसाच प्रकार कोकणातील पत्रकाराचा खून केला जात, असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नूकतंच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशातील काही राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केलीय. त्यामध्ये महाविकास आघाडीने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांची बदली करावी, अशी मागणी लाऊन धरल्यानेच त्यांनी राज्यपालांची हकालपट्टी केल्याचं म्हंटलंय.
फडणवीसांची नवी गुगली.., राष्ट्रवादीचे टीकास्त्र
राज्यात सध्या असैंविधानिक सरकार स्थापन झालं असून ते कोणालाही मान्य नाही, या सरकारकडून जाती-जातीत भांडणे लावणे ,जातीय रंग देण्याचे प्रकार सुरु आहेत. आपला हा लढा संविधान आणि लोकशाहीसाठी असणार आहे, त्यासाठी आपली हीच ताकद येत्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी दाखवून देण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसंवाद यात्रेदरम्यान वारंवार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका-टिपण्या केल्या असून वरळी मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहा, असं खुलं चॅंलेंजही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यावर माझं चॅंलेज मुख्यमंत्री स्वीकारत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला आहे. चिंचवड मतदारसंघात
भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दोन्ही पक्षाकडून आपल्या उमेदवांचा जोरदार प्रचार सुरु असून ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचं मानलं जातंय.