Download App

अजितदादांचा राजीनामा! जिल्हा बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांची राजकारणात होणार ग्रँड एन्ट्री?

  • Written By: Last Updated:

पुणे : महाराष्ट्रासह देशातील आघाडीच्या ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले असून, याच पदावर आता पार्थ यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, नवीन संचालक कोण याबाबत अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. (Parth Pawar May Be Appointed On Pune District Bank Director Post )

Sanjay Raut : गद्दारी-बेईमानी हा ‘अंगार’ नव्हे ‘भंगार’; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अजितदादांची राजकारणात एन्ट्री

मागील 32 वर्षापासून अजित पवार जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. काही काळ ते बँकेचे अध्यक्ष देखील होते. बारामती तालुका अ वर्गातून ते निवडणूक लढवत होते. 1991 साली ते पहिल्यांदा जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. बँकेला राज्यात प्रथम आणण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

साखर कारखान्याचे संचालक ते उपमुख्यमंत्री असा अजितदादांचा राजकीय प्रवास साहिलेला असून, आता पार्थ पवार यांचीदेखील अशाच पद्धतीने बँकेच्या संचालक पदावर वर्णी लावत त्यांना राजकारणात सक्रीय केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात 1982 मध्ये केली होती. त्यावेळी ते अवघे 20 वर्षांचे होते. त्यानंतर 1991 मध्ये ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. या पदावर त्यांनी तब्बल 16 वर्षे काम केले. याशिवाय त्यांनी सहकारी आणि इतर संस्थांमध्ये विविध पदं भूषवली आहे.

रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !

पार्थ पवारांसाठी संधी

मध्यंतरी शरद पवारांपासून वेगळे होते अजितदादांनी शिंदे-भाजपसोबत हातमिळवणी केली. तेव्हापासून अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव जय आणि पार्थ पवार राजकारणात अधिक सक्रीय झाल्याचे पाहयला मिळत आहे. त्याआधी ही दोन्ही मुले फारशी राजकारणात सक्रीय असल्याचे पाहण्यात नव्हते. पार्थ यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती मात्र, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, जय पवार राजकारणापासून लांबच राहिलेले आहे.

मात्र, आता अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचाल पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. बँकेच्या माध्यमातूनच अजितदादांची राज्याच्या राजकारणात एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता पार्थ यांना या पदावर बसवण्याची शक्यता असून याच माध्यमातून पार्थ यांना राज्याच्या राजकारणात ग्रँड एन्ट्री करण्याचे नियोजन अजितदादा करत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us