Ajit Pawar News : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची (Pune News) मतमोजणी अजूनही सुरू आहे. या निवडणुकीत मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) पॅनलची सरशी होताना दिसत आहे. खुद्द अजित पवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच त्यांच्या नेतृत्वातील निळकंठेश्वर पॅनलचे एकूण 9 उमेदलवार विजयी झाले आहेत. तर सहकार पॅनले नेते आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या पॅनलची पिछाडी कायम आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू आहे. सुरुवातील ब वर्ग प्रतिनिधींची मतमोजणी झाली. यात ब वर्गातून अजित पवार उमेदवार होते. त्यांना एकूण 91 मते मिळाली. अजित पवार यांना विजयी घोषित करण्यात आले. विरोधी सहकर पॅनलच्या उमेदवाराला फक्त 10 मते मिळाली.
अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; चांदीच्या ताटातून सदस्यांचा शाही जेवणावर ताव
या निवडणुकीत अजित पवार गटाचे योगेश पवार, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, गणपतराव खलाटे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, देविदास गाडे आघाडीवर आहेत. तावरे गटाचे चंद्रराव तावरे, रणजित खलाटे हेच दोन उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले यांना एकूण 8760 मते मिळाली. विरोधी गटाचे बापूराव गायकवाड यांना 7183 मते मिळाली. त्यामुळे भोसले 1487 मतांनी विजयी झाले आहेत. मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांनी बाजी मारली आहे. शेंडे यांना एकूण 8494 मते मिळाली. सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना 7341 मते मिळाली. शेंडे यांना 1153 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विलास देवकाते आणि महिला राखीव प्रवर्गातून संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले विजयी झाल्या आहेत. विलास देवकाते यांनीही जवळपास 2227 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तसेच बाळासाहेब तावरे, शिवराज राजे, राजेंद्र बुरुगले विजयी झाले आहेत.
माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीची दुसरी फेरी सुरू, २१ पैकी १७ जागी ‘दादा’ पॅनल आघाडीवर