Ajit Pawar on Supriya Sule for Hunger Strike Pune Road : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने शब्द दिल्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतले मात्र याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सुळेंना टोला लगावला.
गर्भवती महिला मृत्यू प्रकरण; डॉ. घैसासच दोषी, गुन्हा दाखल करा; आमदार अमित गोरखे
सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाबाबत माध्यमांनी अजित पवार यांना सुप्रिया सुळे या स्टंटबाजी करत आहेत का? असं सवाल केला होता. त्यावर उत्तर देणे अगोदर अजित पवार यांनी टाळले. ते म्हणाले, या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. नो कमेंट्स, मात्र हा केवळ 600 मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता व्हावा अशी इच्छा असेल तर तो खासदार निधीतून देखील करता येऊ शकतो. असा टोला देखील यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपोषणावरून त्यांना लगावला आहे.
भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. हा रस्ता काँक्रीटचा करावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. तसेच यावेळी तनिषा भिसे मृत्यू या प्रकरणात निश्चितच डॉक्टरांची चूक आहे. ही हत्याच आहे. कारण ती महिला साडेपाच तास कळा देत होती. तरी तुम्ही तिला तयारी करुन दुसऱ्या रुग्णालयात पाठवता. यामध्ये व्यवस्थापनातील चार ते पाच लोकही सहभागी आहेत. यामुळे या प्रकरणात आता कुणाचीच सुटका नाही. जो कुणी यात सहभागी आहे त्याला माफी नाहीच, असा इशारा त्यांनी दिला.