समुद्राच्या पोटातून ‘मुंबई टू दुबई’ प्रवास; खळखळतं पाणी अन् ताशी 1000 किमीचा वेग; वाचा कसा असणार खास प्रोजेक्ट

‘Mumbai to Dubai’ Underwater railway project in Arebian Sea : पाण्यातील जग पाहण्यासाठी अनेक हौशी पर्यटक विविध पर्याय वापरतात. अॅक्वेरिअम, स्कुबा डायव्हिंग यासारख्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र आता पाण्यातील जग पाहण्यासाठी कोणतंही पर्यटन नाही तर प्रवास करतानाच हा आनंद घेता येणार आहे. तसेच दुबईला हवाई मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना आता पाण्यातून दुबईत पोहचता येणार. कारण आता समुद्राच्या पोटातून खळखळतं पाणी अन् ताशी 1000 किमीचा वेग असा ‘मुंबई टू दुबई’ प्रवास करण्यासाठी एक खास प्रोजेक्ट येऊ घातला आहे. काय आहे हा प्रोजेक्ट वाचा सविस्तर…
दोन मुलांना जन्म दिला अन्…, न्यायालयाचा पोटगी प्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का
सिव्हिल इंजीनियरिंग संस्थांकडून यावर गांभीर्याने काम केलं जात आहे. खर्चाचा अंदाज काढला जात आहे. संयुक्त अरब अमीरात (UAE) ची कंपनी नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लिमिटेड (NABL) यांनी ‘मुंबई टू दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रोजेक्ट बद्दल सुचवलं आहे. हे एक हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क असेल जे अरबी समुद्रातून भारत आणि UAE जोडणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन
2018 मध्ये ही संकल्पना समोर आली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यावर विचार केला जात आहे. कारण सध्यादुबईचे क्राउन प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम भारत दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत आले आहेत. यावेळी भारत आणि युएईमध्ये विविध अर्थिक आणि व्यापारी करार केले जाणार आहेत. त्यात गल्फचं वृत्तपत्र खलीज टाईम्सने नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लिमिटेडच्या हवाल्याने यावर एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. हा प्रोजेक्ट सध्या विचारधीन आहे. अगोदर खर्चाची अधिकृत मंजूरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे याबाबत अद्याप काहीही स्पष्ट सांगतास येणार नाही. असं देखील या कंपनीने सांगितलं आहे.
कसा असणार अंडरवाटर रेल्वे प्रोजेक्ट?
नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लिमिटेडने 6 वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची संकल्पना यूएई-इंडिया कॉन्क्लेव अबू-धाबी मध्ये सांगितली होती. यामध्ये अब्दु्ल्ला शेही यांनी अल्ट्रा-स्पीड फ्लोटिंग ट्रेन्सच्या माध्यमातून भारतातील मुंबईला दुबईतील फुजेराहशी जोडण्याची योजना आहे. यातून द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणे, तेल निर्यात तसेच मुंबईच्या उत्तर भागातून नर्मदा नदीचं पाणी दुबईत नेलं जाणार आहे. प्रवाशांसाठी देखील ही सुविधा असणार आहे. कारण विमानापेक्षा प्रवाशांना रेल्वे प्रवास सोपा होणार आहे. याची गती 600 किमी प्रती तास ते 1000 किमी प्रती तास असणार आहे. त्यामुळे दोन तासांत दुबईत पोहचता येणार आहे. विमानने याच प्रवासाला 2-3 तास लागतात.
काँग्रेसच भाजप अन् RSS ला रोखू शकतो; अधिवेशनात राहुल गांधींचं मोठं विधान
हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर याच धर्तीवर दुबईशी पाकिस्तान आणि बांग्लादेशातील शहरं देखील जोडली जाणार आहेत. यासाठी चीन आणि जपान प्रमाणे मॅग्लेव्ह टेक्निक वापरली जाणार आहे. ही रेल्वे चुंबकीय बलाने उचलली जाते त्यामुळे ताशी 1000 किमीची गती साध्य केली जाते. या प्रोजेक्टला लागणाऱ्या खर्चाबाबत सांगायचं झालं तर याचा अंदाज लावणं कठीण आहे.
मात्र 1994 साल 50 किलोमीटरसाठी आजच्या किमतीनुसार लागलेला खर्च हा 21 बिलियन डॉलर एवढा होता. त्यामुळे या 2000 किमीच्या प्रोजेक्टवर अरबो डॉलर्स खर्च येणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाला जमीन अधिग्रहणा सारख्या अडचणी देखील येणार नाही मात्र निसर्गाला हानी पोहोचल्याने समुद्रामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे मुंबई ते दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रोजेक्ट हे एक मोठं स्वप्न आहे ते सत्यात आल्यानंतर मोठी क्रांती होणार आहे.