दादर रेल्वे स्थानकातील बत्ती गुल; प्रवाशांची उडाली तारांबळ, नक्की काय घडलं?
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. दिवसभर काम करून लोक घराच्या दिशेने निघालेले असतात.

मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवरून मोठी बातमी समोर आली आहे. (Pune) मध्ये रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वर काळोख पसरला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 वरील इलेक्ट्रीक पॉवर कट झाल्याचं समोर आलं आहे. आज रात्री 9.45 च्या सुमारास स्टेशन वर अंधार पसरल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रवासांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.
दादर रेल्वे स्टेशनवर सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. दिवसभर काम करून लोक घराच्या दिशेने निघालेले असतात. याच घाईगडबडीत दादर रेल्वे स्टेशनवरील बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. लाईट नसली तरीही लोकल रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याचे समोर आले आहे. मात्र, इलेक्ट्रिक पॉवर कट का झाला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही.
महाराष्ट्रात आढळला या; भयंकर आजाराचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
दादर स्टेशन वरील 9 आणि 10 या प्लॅटफॉर्मवर आज रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास काळोख पसरला. त्यामुळे प्रवाशांना चालताना त्रास होत होता. या घटनेवर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा पॉवर कट का झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या पॉवर कटमुळे लोकलच्या वेळापत्रकात काही बदल झाला का? हेही अद्याप समोर आलेले नाही. मात्र खोळंब्यामुळे प्रवासांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमधील दुचाकींना भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आगीचे लोळ उठताना दूरपर्यंत दिसल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या आगीच्या भडक्याने पंधरा वाहने जळून खाक झाली होती. या घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नव्हता.