आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ जगतातून दुःखद बातमी; जगविख्यात ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्कीचं निधन

चार्लोट बुद्धिबळ केंद्राने सोमवारी एक निवेदन जारी करून ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्कीयांच्या निधनाची माहिती दिली.

  • Written By: Published:
News Photo (37)

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ जगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. (UK) अमेरिकेचा प्रख्यात बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की याचं वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अचानक निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

चार्लोट बुद्धिबळ केंद्राने सोमवारी एक निवेदन जारी करून नरोडित्स्की यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. डॅनियल नरोडित्स्की हा अमेरिकेच्या बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वात हुशार आणि आश्वासक प्रतिभांपैकी एक होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता.

आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार; पाकिस्तानच्या नक्वीवाला बीसीसीआयचा थेट इशारा

डॅनियल हा केवळ खेळाडूच नव्हता तर एक उत्कृष्ट बुद्धिबळ समालोचक आणि लेखकही होता. वयाच्या १४ व्या वर्षीच ‘मास्टरिंग पोझिशनल चेस’नावाचे पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचे वडील व्लादिमीर युक्रेनचे, तर आई लीना अझरबैजानची होती. नुकतीच यूएस नॅशनल ब्लिट्झ चॅम्पियनशिप जिंकली होती.

नरोडित्स्की यांच्या आकस्मिक निधनानंतर भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की यांच्या निधनाची बातमी ऐकून मी खरोखरच स्तब्ध झालो आहे. ते एक उत्कृष्ट बुद्धिबळ समालोचक आणि शिक्षक होते. एक खरे आणि सज्जन माणूस. त्यांचे आयुष्य खूप लवकर संपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या तीव्र संवेदना. बुद्धिबळ जगताला त्यांची उणीव भासेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

follow us