राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का! प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचं निधन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतरही देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत होते.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (Pawar) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. राजीव देशमुख यांच्या निधनामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते. मात्र, त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी राजीव देशमुख यांची ओळख होती.
देशमुख यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्यांना अचानक अस्व
स्थ जाणवू लागल्यानं धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वानं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, तसेच 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य देखील होते.
स्वत: ला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा; शेतकऱ्यांच्या परिषदमध्ये बच्चू कडूंची जीभ घसरली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, दुसरीकडे राजीव देशमुख यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला, शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून राजीव देशमुख यांना ओळखलं जायचं, त्यामुळे पक्षात त्यांना महत्त्वाचं स्थान होतं. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी देखील सोपवली होती.
राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, ते 2009 ते 2014 या कार्यकाळात विधानसभेचे सदस्य होते. मात्र त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
आपला सहकारी गेल्याचं दु:ख शरद पवार यांनीही ट्वीटवर मांडलं आहे. माझे सहकारी व चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अकस्मित आहे. नगराध्यक्षापासून ते आमदारापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत सामान्य जनतेशी जोडलेली नाळ हिच त्यांची खरी ताकद ठरली. संघटना वाढीसाठीही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्थानिकसह राज्य पातळीवर जनमनांमध्ये त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा अभिमानास्पद आहे. पक्षाने त्यांच्या रूपाने एक लोकाभिमुख व निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली! असं पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
माझे सहकारी व चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अकस्मित आहे. नगराध्यक्षापासून ते आमदारापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत सामान्य जनतेशी जोडलेली नाळ हिच त्यांची खरी ताकद ठरली. संघटना वाढीसाठीही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्थानिकसह राज्य पातळीवर… pic.twitter.com/BpctQTCzT0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 21, 2025