काँग्रेसच भाजप अन् RSS ला रोखू शकतो; अधिवेशनात राहुल गांधींचं मोठं विधान

Rahul Gandhi : काँग्रेस पक्षाच अधिवेशन (Congress Session) आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये पार पडलं. या अधिवेशनाला काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधलायं. फक्त काँग्रेसच भाजप आणि आरएसएसला रोखू शकतो बाकी पक्ष रोखू शकत नसल्याचं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलंय.
खुशखबर! गोल्ड लोन EMI मध्ये फेडता येणार, बॅंकांच्या मनमानीला चपराक बसणार; RBI चा प्लॅन काय?
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि भाजप रोज राज्यघटनेवर आक्रमण करीत आहेत. ही विचारधारेची लढाई आहे, ज्या पक्षाकडे विचारधारा नाही तो पक्ष भाजप, आरएसएससमोर उभा राहु शकत नाही. त्यामुळे केवळ काँग्रेसच भाजपला रोखू शकतं, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
महागाईने त्रस्त नागरिकांना RBI ने दिली गुडन्यूज; रेपोदरात कपात, होम लोनचा EMI कमी होणार
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, स्वातंत्र्य युद्धात आपण केवळ इंग्रजांशी लढलो नव्हतो. आपण इंग्रज आणि आरएसएसच्या विचारधेरच्या विरोधात लढलो होतो. या सर्व आरएसएसच्या लोकांची विचारधारा स्वातंत्र्य युद्धाची विचारधारा नाही. ज्या दिवशी राज्यघटना लागू झाली होती, ज्या दिवशी हे राज्यघटना लिहिली गेली होती, त्या दिवशी या राज्यघटनेच्याविरोधात आरएसएसने रामलिला मैदानात ही राज्यघटना जाळली होती. त्यांची विचारधारा राज्यघटनेच्या विरोधात आहे. ते लोकशाहीला संपवू इच्छित, असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केलीयं.
तसेच ते भारतामधील सर्वच्या सर्व संस्था नियंत्रणात आणू इच्छितात आणि भारताची सर्व संपत्ती अंबानी, अदाणीच्या स्वाधीन करून देवू इच्छितात. आमची विचारधारा सांगते की, हा देश प्रत्येक जातीचा, धर्माचा आहे. प्रत्येक भाषेचा आहे. या देशातील संस्था केवळ एका संघटनेच्या नाहीत. या देशातील जनतेच्या आहेत. जनतेचे त्या संस्थांवर नियंत्रण असायला हवे. ही लढाई सुरू आहे.” असं राहुल गांधींनी सांगितलं.